महाराष्ट्रासह देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. या लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नागरिकांना फक्त अत्यावश्यक सेवासुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरु नये अन्यथा कारवाई करण्यात येईल अशा सुचना देऊन सुद्धा त्याचे उल्लंघन केले जात आहेत. त्यामुळे पोलिसांना बेजबाबदार नागरिकांच्या विरोधात कारवाई करावी लागत आहे. नांदेड येथे लॉकडाउनच्या काळात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांच्या विरोधात वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल 53 लाख रुपयांची दंड वसूली केली आहे.
लॉकडाउनच्या काळात वाहनावरुन फिरणाऱ्यावर बंदी आहे. तरीही नागरिक बाहेर कोणत्या ना कोणत्या कारणावरुन घराबाहेर पडत फिरत आहेत. तर वाहनावरुन फिरताना मात्र परवाना नसल्याच्या कारस्तव वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाई नंतर रस्त्यारुन फिरणाऱ्यांची संख्या कमी होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.(Coronavirus Update: महाराष्ट्रात आणखी 3 नवे रुग्ण आढळले; राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 338 वर)
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरुवातीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात जमावबंदी कायदा लागू केला होता. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी 24 मार्च रोजी संपूर्ण देशात 21 दिवसांकरिता संचारबंदी घोषीत केली. तसेच कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. दरम्यान, दक्षिण मुंबईतील आतापर्यंत एकूण 191 परिसर सील करण्यात आले आहेत.