Coronavirus In Maharashtra: BMC चा 52 वर्षीय  सफाई कामगार धारावी मधील दुसरा कोरोनाबाधित रूग्ण; कुटुंबीयांसह 23 सह  कर्मचारी क्वारंटीन
कोरोना व्हायरस | प्रतिनिधित्व प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रासह मुंबईमध्ये वाढणारी कोरोनाबधितांची संख्या लोकांच्या मनात अस्वस्थता आणि भीती वाढवत आहे. आज मुंबईच्या धारावी परिसरात दुसरा कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. ही व्यक्ती 52 वर्षीय असून मुंबई महानगर पालिकेत स्वच्छता कामगार आहे. दरम्यान ते वरळीतील रहिवासी असून त्यांना साफसफाईचं काम करण्यासाठी धारावी मधील भाग देण्यात आला होता. काही दिवसांपासुन त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणं आढळल्याने पालिका अधिकार्‍यांनी त्यांना उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. आता त्यांच्या संपर्कात आलेले कुटुंबीय आणि 23 इतर सहकर्मचारी यांना क्वारंटीन करण्यात आले आहे. अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. Coronavirus: मुंबई शहरातील धारावी झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या कोरोना व्हायरस बाधित 56 वर्षीय व्यक्तिचा मृत्यू.  

काल मुंबईमध्ये रात्री उशिरा धारावीमधील एका 56 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर पोलिस आणि प्रशासनाच्य इतर अधिकार्‍यांनी आजुबाजूच्या भागात सुरक्षा चोख केली आहे. मागील काही दिवसांपासून वरळी कोळीवाडा हा भग देखील पोलिसांनी पूर्णपणे सील केला आहे. नागरिकांच्या वर्दळीवर या भागात बंधनं घालण्यात आली आहेत.

ANI Tweet

महाराष्ट्रात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा 338 पर्यंत पोहचला आहे.आज सकाळी, बुलढाण्यात एक तर, पुणे येथे 2 कोरोनाबाधीत नवे रुग्ण आढळले. तर कोरोना संसर्गाचा सर्वात लहान रूग्ण देखील चेंबुर परिसरात आढळला आहे. अवघ्या 3 दिवसाच्या चिमुकल्याला साई हॉस्पिटलमध्ये कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे काही रूग्णांलयांमध्ये अंशतः सेवा खंडीत करण्यात आली आहे.