Coronavirus: मुंबई शहरातील धारावी झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या कोरोना व्हायरस बाधित 56 वर्षीय व्यक्तिचा मृत्यू
Dharavi (Photo Credits: Wikimedia Commons)

मुंबईतील धारावी (Dharavi Slum) येथील कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधित व्यक्तिचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. हा व्यक्ती 56 वर्षे वायाचा होता. या व्यक्तिला कोरोना व्हायरस (COVID-19) लागन झाल्याचे आजच पुढे आले होते. या व्यक्तिची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याला उपचारासाठी मुंबई येथील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाल्याचे समजते.  हा व्यक्ती धारावी परिसरातील शाहू नगर (Shahu Nagar) येथे राहात होता.

धारावी ही अशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. त्यामुळे संभाव्य धोका विचारात घेऊन मुंबई महापालिका आणि राज्य सरकार अत्यंत दक्षता घेताना दिसत आहे. हा व्यक्ती राहात असलेल्या धारावी परिसरातील इमारत मुंबई पोलीस आणि महापालिका कर्मचाऱ्यांनी सील केली आहे. तसेच, या व्यक्तिच्या कुटुंबातील 7 सदस्यांना अलगिकरण कक्षात ठेवले आहे. त्यांची कोरोना व्हायरस चाचणीही केली जाणार आहे. या व्यक्तिच्या संपर्कात आलेल्या इतर नागरिकांचाही तपास सुरु आहे. (हेही वाचा, Coronavirus: मुंबईमधील धारावी झोपडपट्टी मध्ये आढळला कोरोना विषाणूचा रुग्ण; उपचार सुरु, कुटुंबालाही ठेवले वेगळे)

एएनआय ट्विट

दरम्यान, मुंबई येथील वरळी येथील सायन कोळिवाडा परिसरातील 86 नागरिकांना पोद्दार हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. मुंबई येथे सोमवारी काही नागरिकांना कोरोना व्हायरसची बाधा झाल्याचे पुढे आल्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागाने हा परिसर कोरोना व्हायरस हॉटस्पॉट म्हणून घोषीत केला आहे.