Coronavirus: मुंबईत आज नवे 103 कोरोनाबाधित रुग्ण तर 8 जणांचा मृत्यू
Coronavirus cases | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. तरीही कोरोनाचे नवे रुग्ण प्रत्येक दिवशी समोर येत आहेत. याच पार्श्वभुमीवर मुंबईत आज कोरोनाचे 103 रुग्ण आढळून आले आहेत. तर 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महानगरपालिका बृहत्तर मुंबई यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी व्हिडिओच्या माध्यमातून बातचीत करत लॉकडाउन वाढवायचा की नाही आता हे नागरिकांच्या हातात असल्याचे म्हटले आहे. लॉकडाउनच्या काळात नागरिकांनी गर्दी करु नये असे वारंवार सांगण्यात येत आहे. तरीही नागरिक नियमांचे उल्लंघटन करताना दिसून येत असल्याने परिणामी कायदेशीर कारवाई करावी लागत आहे.

महानगरपालिका बृहत्तर मुंबई यांनी कोरोना संक्रमित रुग्णांबाबत अधिक माहिती दिली आहे. आज मुंबईत कोरोनाचे नवे 103 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 433 वर पोहचला आहे. त्याचसोबत 8 जणांचा आजच्या दिवसात मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा 30 वर गेला आहे. तर 54 पैकी 20 जणांनी कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.(महाराष्ट्र: लॉकडाऊनच्या काळात गरजूंना आवश्यक सेवा पुरविण्यासाठी सरकारने केली मुंबई, पालघर, रत्नागिरीसह 'या' जिल्ह्यांत विभागीय नोडल अधिका-यांची नेमणूक, येथे पाहा संपूर्ण यादी)

दरम्यान,  देशात कोरोनाबाधित 3374 रुग्ण असून कालपासून ते आतापर्यंत 42 नव्या रुग्णांची यामध्ये भर पडल्याचे म्हटले आहे. एकूण 79 जणांचा कोरोना व्हायरसने मृत्यू झाला आहे. तर 267 जणांनी उपचार घेऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच तबलीगी जमीच्या नागरिकांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत.