राज्यात कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांसाठी बेड कमी असल्याचे किंवा उपलब्ध नसल्याचे चित्र नाही. पुरेशा प्रमाणात बेड्स उपलब्ध असल्याची ग्वाही राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. असे असले तरी बेड न मिळाल्याने नाशिक महापालिका (Nashik Municipal Corporation) मुख्यालयात एका कोरोना रुग्णाला ( Corona Patient) चक्क ऑक्सिजन सिलिंडर (Oxygen Cylinder) सह आंदोलन करावे लागले आहे. या आंदोलकाचा आज (1 एप्रिल) मृत्यू झाला. ही घटना नाशिक येथे घडली. या रुग्णाला बेड नेमका कोणत्या काराणामुळे मिळाला नाही तसेच, बेड न मिळणे हेच कारण या रुग्णाच्या आंदोलनामागे होते का याबाबत स्पष्ट माहिती मिळू शकली नाही. परंतू, घडलेला प्रकार गंभीर आहे, अशी भावना व्यक्त होते आहे.
बेड मिळावा या मागणीसाठी या कोरोन रुग्णाने नाशिक महापालिका मुख्यालयात बुधवारी (31 मार्च) संध्याकाळी आंदोलन केले. त्यानंतर आंदोलनाची दखल घेऊन पालिकेने या रुग्णाला बेड उपलब्ध करुन दिला. या रुग्णास बिटको रुग्णालयात दाखल केले. याच रुग्णालयात या रुग्णचा मृत्यू झाला.
दरम्यान, आपल्यामुळे इतरांना कोरोना संसर्ग होऊ शकतो हे माहिती असतानाही आंदोलन केल्याबद्दल आणि संबंधित व्यक्तीस आंदोलन करण्यासाठी घेऊन आल्याबद्दल काही व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. कोरोना रुग्णाला आंदोलनासाठी घेऊन येणाऱ्या संबंधितांवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (हेही वाचा, COVID Tests Rates In Maharashtra: राज्यात कोविड चाचण्यांच्या दरांमध्ये पुन्हा कपात; जाणून घ्या रॅपीड अँटीजेन, अँटीबॉडीज, RT PCR Test चे नवे दर)
कोरोना व्हयारस नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. त्यासाठी कठोर नियमांना समारे जाण्याचा इशारा राज्य सरकारने दिला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करावा लागतो की काय? अशी स्थिती आहे. दरम्यान, कोरोना पाळा लॉकडाऊन टाळा असे अवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. मात्र, अनेकदा विनंती करुनही नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. कोरोना नियमांचे उल्लंघन करत आहेत. त्यामुळे सरकार आता कठोर पावले टाकण्याच्या विचारात आहे.