Lok Sabha Ealections 2019: राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी (जस Narendra Modi) काय करत होते? असा खडा सवाल विचारत जाती धर्माच्या नावावर मतदारांना आकर्शित करायचे हे संघ परिवार आणि भाजपची निवडणूक राजकारणातील फारच जुनी सवय आहे. या निवडणूकीतही ते हेच करत आहेत. सोलापूर येथील जाहीर सभेत मोदींनी केलेले आपण मागासवर्गिय आहोत त्यामुळेच काँग्रेस आपल्यावर टीका करत आहे हे विधान त्याचा पुरावाच आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन (Dr Ratnakar Mahajan)यांनी केली आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांची जात काढल्यामुळे संघ परिवाराच्या नाकाला फारच मिरच्या झोंबल्या पण याच राष्ट्रपतींची उमेदवारी जाहीर करताना मात्र भाजपाच्या तडीपार अध्यक्षांनी स्वतः रामनाथ कोविंद यांची जात जाहीर केली होती, हे अजून कोणी विसरलेले नाही. पण हेच राष्ट्रपती जेव्हा वेगवेगळ्या मंदिरात जात होते, तेव्हा तिथले पुजारी त्यांना देवळाच्या गाभाऱ्यात प्रवेश करु देत नव्हते, तेव्हा संघ परिवार आणि भाजपाने ते कसे चालू दिले. आज दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांचा पुळका आलेल्या प्रधानमंत्र्यांनी तेव्हा काय केले? असा सवाल महाजन यांनी उपस्थित केला आहे.
देशात सुरु असलेल्या लोकसभा निवडणूक आता ऐन रंगात आली आहे. सात टप्प्यात पार पडत असलेल्या या निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यासाठी मतदान पूर्ण झाले आहे. आज (18 एप्रिल 2019) दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे. तर, उर्वरीत पाच टप्प्यांचे मतदान अद्याप बाकी आहे. त्यामुळे सर्वच राजकी पक्षांकडून एकमेकांवर आरप प्रत्यारोप सुरु आहेत.