Lok Sabha Election 2019: मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघ (Wadala Vidhan Sabha Constituency) हा काँग्रेससाठी चिंतेचा विषय ठरु शकतो. वडाळा येथील काँग्रेस आमदार (Congress MLA) कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar) हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कालिदास कोळंबकर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो बॅनरवर झळकवल्याने ही चर्चा अधिक वाढली. विशेष म्हणजे कोळंबकर यांनी दादर येथील काँग्रेसच्या टिळक भवन कार्यालयासमोरच हे बॅनर झळकावले. मुख्यमंत्र्यांशिवाय काँग्रेसच्या कोणत्याच नेत्याचा फोटो नव्हता, त्यामुळे कोळंबकर हे विखे-पाटील यांची वाट धरत भाजपमध्ये प्रवेश करणार का? याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा फोटो कार्यालयावर का लावला याबाबत कोळंबकर यांनी एका वृत्तसंस्थेकडे स्पष्टीकरण दिले.
आमदार कालिदास कोळंबकर यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, 'मी काँग्रेससाठी 10 वर्षे काम केले आहे. परंतू, कॉंग्रेसने माझ्या मतदारसंघ क्षेत्रात काहीच काम केले नाही. त्याउलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदा ग्रहण केल्यानंतर, माझ्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर काम केले. आमच्या अनेक मागण्या पूर्ण केल्या. असे असेल तर मग, कोणाचा फोटो मी माझ्यासोबत कोणाचा लावला पाहिजे?, असा सवालही कोळंबकर यांनी विचारला आहे. (हेही वाचा, काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीवर सुजय विखे-पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश)
Congress MLA K Kolambkar: I've worked for Congress for 10 yrs.Congress didn't do any work in my area. After D.Fadnavis took over as CM, I told him about work needed to be done in my area& he completed those works. Then, whose photo should I put? Those who work or those who don't? pic.twitter.com/GH6Dovu5Gu
— ANI (@ANI) March 13, 2019
आमदार कोळंबकर यांनी दादर येथील काँग्रेसच्या टिळक भवन कार्यालयासमोरच कालिदास कोळंबकर यांनी बॅनरवर मुख्यमंत्र्यांचा फोटो लावून आपली दिशा स्पष्ट केली आहे. कोळंबकर हे आतापर्यंत सहा वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. पूर्वी हा मतदारसंघ नायगाव विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा. मात्र, मतदारसंघ फेररचनेत हा मतदारसंघ वडाळा विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. कालिदास कोळंबकर हे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात.