राज्यपाल हे भाजपचे बाहुले आहेत का? सचिन सावंत यांचा सवाल
Sachin Sawant | (Photo courtesy. Twitter)

विधानसभेचा निकाल लागून 19 दिवस उलटले आहेत. परंतु, तरीदेखील सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही. भाजप-शिवसेना वाद काही निवळताना दिसत नाही. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापन करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, सत्तास्थापन करता न आल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवटही लागू होऊ शकते. दरम्यान, काँग्रेस नेत सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी भाजपवर टीका केली आहे. राज्यपाल हे भाजपचे बाहुले आहेत का? असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे.

राज्यपाल हे भाजपचे बाहुले आहेत का? सत्तास्थापनेसाठी पुरेसे प्रयत्न न करता इतर पक्षांना पुरेसा वेळ न देता व राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेला वेळ संपण्याची वाटही न पाहता जर त्यांनी राष्ट्रपती राजवटी शिफारस केली आहे. हे खरे असेल, तर त्यांची भूमिका त्यांच्या टोपीच्या रंगाला साजेशी ठरेल, असंही त्यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - Maharashtra Government Formation Live News Updates: राष्ट्रवादी काँग्रेस सत्तास्थापनेचा दावा करणार का?)

सचिन सावंत यांचे ट्विट - 

दरम्यान, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तयारी सुरु झाली असल्याची माहिती येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने असमर्थता दाखवल्यास महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. या संदर्भात संध्याकाळी 8.30 पर्यंत निर्णय घेण्यात येईल. राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे या संदर्भातला अहवाल पाठवला आहे.