Image used for representational purpose only (Photo Credits: PTI)

कॉंग्रेस नेते माणिवराव गावित (Manikrao Gavit) यांनी आज ( 5 एप्रिल) आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. काही दिवसांपूर्वी गायब झालेले भगवानसिंह रामचंद्र गिरासे (Bhagwan Girase) हे माणिकरावांचे स्वीय केस आणि मिशी कापलेल्या अवस्थेमध्ये आढळले. तेव्हापासूनच ते तणावामध्ये होते. आज त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.

भगवानसिंह रामचंद्र गिरासे यांनी आज राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी वेळीच दोर कापल्याने त्यांचा जीव बचावला आहे. सध्या नंदूरबारच्या शिंदे रूग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. भगवानसिंह यांची प्रकृती चिंताजनक आहे. भगवानसिंह यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. Lok Sabha Elections 2019: नंदुरबार मध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का, भरत गावित यांना तिकीट नाकरल्याने माणिकराव गावित नाराज; 'भाजप' ला करणार मदत?

30 मार्च दिवशी मुंबईतील बैठकीमध्ये माणिकराव गावित यांच्यासोबत भगवानसिंह उपस्थित होते मात्र त्यानंतर अचानक गायब झालेले भगवानसिंह 1 एप्रिल दिवशी घरी आले होते.