Congress Vs BJP: नागपुरात संघ मुख्यालयाजवळ काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले, कशामुळे पेटला वाद? घ्या जाणून
BJP VS CONGRESS| (Photo courtesy: archived, edited, representative image)

देशात इंधनदरवाढी (Fuel Price) आणि घरगुती गॅसच्या (LPG price) किंमतीत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे वाढत्या महागाईचा सर्वसामन्यांना फटका बसू लागला आहे. याचपार्श्वभूमीवर नागपूर (Nagpur) येथील काँग्रेसचे (Congress) स्थानिक नगरसेवक बंटी शेळके (Bunty Shelke) यांनी महागाई आणि अनेक मुद्यांवरून केंद्र सरकारविरोधात रॅली काढली होती. याचदरम्यान, नागपूरात संघ मुख्यालयाजवळ काँग्रेस आणि भाजपचे (BJP) कार्यकर्ते आमने-सामने आल्याने त्यांच्यात धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही पक्षातील वाद मिटवण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली आहे.

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, नागपूरातील संघ मुख्यालयाचा परिसर हा दाटीवाटीचा असून, सुरक्षेच्या कारणास्तव तिथे वाहतुकीवर अनेक निर्बंध आहेत. मात्र, काँग्रेस कार्यकर्त्यांनी तिथूनच रॅली काढण्याचा हट्ट धरला. याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला. ज्यामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. या परिस्थीतीचे गांभीर्य पाहून घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना घटनास्थळावरून मागे जावे लागल्याचे सांगितले जात आहे. हे देखील वाचा- Keshav Upadhya on Thackeray Government: 12 वी चा निकाल लांबल्याने केशव उपाध्ये यांची ठाकरे सरकारवर जोरदार टीका

वाढत्या महागाई मुळे केंद्र सरकार विरोधात आंदोलन, मोर्चे होत आहेत. पेट्रोल, डीझेलचे दर गगणाला भिडले आहेत. तसेच पेगासस मुळे विरोधी पक्ष केंद्र सरकारचे जोरदार विरोध करत आहे. यावर संसदीय पावसाळी अधिवेशनात आरोप प्रत्यारोप देखील झाले आहेत.

दरम्यान, मुंबईत आजचा एक लीटर पेट्रोलचा भाव 107. 83 रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल 101.84 रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव 102.49 रुपये इतका आहे. तर, कोलकात्यात एक लीटर पेट्रोल 102.08 रुपये झाले आहे. भोपाळमध्ये सध्या पेट्रोलचा भाव 110.20 रुपयांवर कायम आहे. बंगळुरात पेट्रोल 105.25 रुपये झाले आहे. यावरुन काँग्रेस मोदी सरकारवर टीका करत आहे.