Maharashtra Politics: शेतकऱ्यांच्या नुकसानीवरून विधानसभेत गोंधळ, विरोधी आमदारांनी केला सभात्याग
Maharashtra Legislative Assembly | (Photo Credits: Twitter)

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकारच्या (State Government) असमाधानकारक प्रतिसादाच्या निषेधार्थ महाराष्ट्र विधानसभेतील (Maharashtra Legislative Assembly) विरोधी पक्षांच्या आमदारांनी सोमवारी सभात्याग केला. सकाळी 11 वाजता विधानसभेचे कामकाज सुरू झाले.

दरम्यान, राज्यातील विविध भागात पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे विरोधी पक्षनेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले. अजित पवार म्हणाले की, सरकारी अधिकाऱ्यांनी नुकसान मूल्यांकन अहवालावर किंवा पंचनाम्यावर सही करण्यास नकार दिला आहे. त्याचवेळी राज्य सरकार हा प्रश्न सोडविण्यासाठी ठोस पावले उचलत नाही. हेही वाचा Sangli Mayor's Cup Wrestling Viral Video: सांगली येथील महापौर चषक कुस्ती स्पर्धेत राडा, माऊली कोकाटे याने फोडले हमीद इराणी याचे डोके

महाराष्ट्राचे महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, आम्ही अधिकाऱ्यांना सर्वेक्षण करण्यास सांगितले आहे. नुकसान मूल्यांकन अहवाल अंतिम केला जाईल आणि अधिकार्‍यांची स्वाक्षरी होईल याची आम्ही खात्री करू. पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची माहिती घेतल्यानंतर आम्ही त्यांना काही मदत देऊ. सध्या पवार आणि इतर विरोधी आमदारांनी सरकारचे उत्तर असमाधानकारक असल्याचे सांगत विधानसभेतून सभात्याग केला.

याआधीही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या मुद्द्यावर सभागृहात आक्रमक भूमिका घेतली होती. शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मुद्दा गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले. शेतकरी जगला तर राज्य टिकेल. त्यानुसार सरकारने काम करावे, असे अजित पवार म्हणाले होते. त्यांच्या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिसाद दिला होता. हेही वाचा Mahim Fort Slum Area demolition Video: बीएमसीने हटवल्या माहीम किल्ला परिसरातील जीर्ण झोपड्या

सरकारने शेतकऱ्यांना आणखी मदत द्यावी, अशी मागणी अजित पवार यांनी सभागृहात केली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, अवकाळी पावसाबाबत नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत स्वत: नुकसानग्रस्त भागात गेले आहेत. तेथे पंचनामा सुरू आहे. मी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशीही बोललो आहे.