CNG Price Hike: ग्राहकांना झटका! मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी वाढ
CNG | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबईत सीएनजी आणि पीएनजी गॅसची दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना सीएनजी आणि पीएनजीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. मुंबईत महानगर गॅस लिमिटेडने 9 जुलैपासून मुंबईसह आसपासच्या परिसरात सीएनजी आणि घरगुती पीएनजीच्या किंमतीमध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सीएनजी आणि पीएनजीचे नवे दर 9 जुलैच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. दरम्यान या निर्णयामुळे आधीच महागाईला त्रस्त झालेली जनता ही सरकारवर आणखीनच नाराज झाली आहे. सध्या अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत आणि पेट्रोल, डिझेलपर्यंत सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. अशातच आता सीएनजीचा बोजा देखील त्यांच्यावर पडणार आहे. (हेही वाचा - WPI Inflation Data: भारताचा महागाईचा दर मे महिन्यात 2.61% वर पोहोचला)

पाहा पोस्ट -

मुंबईत सीएनजीच्या दरात दीड रुपयांची आणि पीएनजीचे दरामध्ये 1 रुपयाची वाढ कऱण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता एका किलोच्या सीएनजीसाठी 75 रुपये द्यावे लगणार आहेत. तर पीएनजीच्या दरात 1 रुपयाची वाढ झाल्यामुळे पीएनजीचा आधीच्या 47 रुपयांचा दर आता 48 रुपये होणार आहे.