महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त आज सह्यादी अतिथीगृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar), राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांसह (Sharad Pawar) अनेक मविआचे दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यासह शरद पवारांनी 'महाराष्ट्र थांबला नाही आणि थांबणार नाही' या पुस्तकाचं प्रकाशन केले. या पुस्तकात महाविकास आघाडी सरकारने वर्षभरात केलेल्या कामांचा लेखाजोगा या पुस्तकात मांडण्यात आला आहे. यावेळी शरद पवारांनी महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन करत सरकारमध्ये चांगला समन्वय असल्याचे सांगितले.
त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझी टीम उत्तम असून सर्वांना कोरोना काळात उत्तम काम केल्याचे सांगितले. महाराष्ट्र घाबरला नाही आणि घाबरणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी पुस्तक प्रकाशनावेळी सांगितले. जनतेचा सरकारवर विश्वास असून जनतेसह सर्व अनुभवी नेत्यांचे सहकार्य मिळाले असेही मुख्यमंत्र्यांनी यथे आर्वजून सांगितले. शिवसेना फरफटत जाणारा पक्ष नाही तसेच तिन्ही पक्षात आठमुठेपणा नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.हेदेखील वाचा- MNS To Maharashtra Government: लष्करातील जवान, माजी सैनिक आणि त्यांच्या परिवारांबाबत मनसेची राज्य सरकारकडे महत्वाची मागणी
'महाराष्ट्र थांबला नाही.महाराष्ट्र थांबणार नाही.' पुस्तिकेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते खासदार @PawarSpeaks, उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks, महसूलमंत्री @bb_thorat, उद्योगमंत्री @Subhash_Desai, राज्यमंत्री @iAditiTatkare यांच्या हस्ते प्रकाशन. pic.twitter.com/dv54c00rGh
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) December 3, 2020
तसेच कोरोनाच्या संकटात सरकारची कामगिरी उत्तम आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले. त्याचबरोबर कोरोनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा इतका अभ्यास झाला आहे की ते अर्धे डॉक्टर झाले आहेत असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खूप चांगलं नेतृत्त्व केलं. खरंतर मुख्यमंत्र्यांना प्रशासनाचा अनुभव नाही. महाविकास आघाडीचा प्रयोग जेव्हा झाला तेव्हा त्यांना हे सगळं कसं जमेल अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. मात्र त्यांना प्रशासकीय अनुभव नसला तरीही त्यांच्या चातुर्यात काहीही कमतरता नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी सांगितले.