Photo Credit- X

Devendra Fadnavis Perform Ganesh Puja: देशभरात आज घरोघरी गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) यांच्या शासकीय निवासस्थान वर्षावरही बाप्पा विराजमान झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या घरच्या गणपतीचे फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या अक्स अकाऊंटवर टाकले आहेत. दरम्यान यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील बळीराजावरील विघ्न दूर व्हावं असं साकडं त्यांनी गणपती बाप्पाच्या चरणी घातलं आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान समृद्ध व्हावे. चालू वर्षी पाऊस चांगला झाला आहे.  तसेच महायुती सरकारने चांगल्या योजना आणल्या आहेत.अशा आशयाचं ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.(हेही वाचा: Raj Thackeray Perform Ganesh Puja: राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचं आगमन; सहकुटुंब, गाणरायाची पहिली आरती संपन्न (Watch Video))

झेंडूच्या पिवळ्या फुलांची सुंदर सजावट करत बाप्पासाठी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी विधिवत बाप्पाची पूजा(Ganesh Puja) करत प्राणप्रतिष्ठा केली. मुख्यमंत्र्यांसह त्यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनीही गणरायाची पूजा केली. 

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी बाप्पा विराजमान 

तसेच उध्दव ठाकरे यांनी सहकुटुंब आज पहिल्याच वर्षी लालबाग राजाचे दर्शन घेतले . यावेळी त्यांच्या समवेत आदित्य ठाकरे व रश्मी ठाकरे यांच्यासह सर्वांनी दर्शन घेतले.सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील उध्दव ठाकरे कुटुंबीय लालबागचा राजाच्या चरणी नथमस्तक झाले.लालबागचा राजा हा नवसाला पावणारा गणपती म्हणून राजाची संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती आहे. तसेच उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान सागर या बंगल्यावर गणपती बाप्पा विराजमान झाले आहे.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहकुटुंब गणपती बाप्पाच्या भक्तीत तल्लीन झाले होते. आज कलाकारांसह खेळाडूंच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. गणपती बाप्पाचे आगमन वाजत गाजत झाले आहे.