CM Eknath Shinde | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. सफाई कर्मचा-यांच्या मुलांच्या परदेशातील शिक्षणाचा (Abroad Education)खर्च पालिका करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बोलताना केली. "मुंबई (BMC) महापालिका सर्व सुविधा उपलब्ध असणाऱ्या देशातील पालिकांपैकी एक आहे. क्वालिटी आणि कॅान्टीटीमध्ये काहीच तडजोड नाही. मुंबईचा हिरो सफाई कर्मचारी (BMC Worker)आहे.त्यामुळे त्यांच्या मुलांच्या परदेश शिक्षणाचा खर्च पालिका करणार आहे", अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. (हेही वाचा:Free Education for Girls in Maharashtra: मुलींना मोफत शिक्षण; मेडिकल, इंजिनिअरिंग 600 अभ्यासक्रमांना घेता येणार प्रवेश )

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, 10 हजार कोटी पेक्षा जास्तीचे प्रकल्प कधीच मुंबई महापालिकेत झाले नव्हते. सध्या 2 लाख कोटींचे प्रकल्प मुंबई मनपात सुरु आहेत. मनपाच्या जीवावर इतर लोकांनी खर्च केला. केईएमला गेलो होतो तेव्हा 3 वॅार्ड बंद होते आता ते सुरु केलेत 360 बेड वाढतील. घरी बसून काही कळत नाही फिल्डवर जावं लागतं. झिरो प्रिस्क्रिपशन केले आहेत. 3 हजार कोटी रुपयांची औषधे फ्री दिली. 3 हजार कोटी रुपयांची औषधे फ्री देणारी ही जगातील पहिली महापालिका आहे.

मला काय मिळतं यापेक्षा लोकांना काय मिळतंय हे बघा, असं आवाहनही एकनाथ शिंदे यांनी केलं. यावेळी त्यांनी नायर हॉस्पिटलमधील ऑपरेशन, सोयी-सुविधा आणि तेथील कामकाजावर भाष्य केले. ५ स्टार हॉटेलपेक्षा हॉस्पीटल कमी नसेल असही ते म्हणाले.