CIDCO Housing Scheme: नवी मुंबईमध्ये (New Mumbai) स्वतःच्या घराचे स्वप्न असलेल्या लोकांसाठी दिलासादायक बाब आहे. एकूण 902 सदनिकांची नवीन गृहनिर्माण योजना सिडकोतर्फे (CIDCO) नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सोमवारी साजऱ्या होणाऱ्या कृष्ण जन्माष्टमी उत्सवानिमित्त, संस्थेने नवीन गृहनिर्माण योजनेला हिरवा झेंडा दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना समाजातील सर्व घटकांना त्यांचे हक्काचे घर घेण्यास मदत करेल. याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले, ‘जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर ही योजना सुरू करण्यात येत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी एकूण 38 सदनिका राखीव आहेत. नवी मुंबईतील कळंबोली, खारघर आणि घणसोली या विकसित नोड्समध्ये 175 सदनिका सर्वसाधारण वर्गासाठी ठेवण्यात आल्या आहेत.’
उर्वरित 689 सदनिका खारघर येथील सिडकोच्या स्वप्नपूर्ती आणि वास्तुविहार सेलिब्रेशन येथे आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले, ‘या योजनेतील प्रत्येक फ्लॅटचा ताबा तयार आहे. सर्व फ्लॅट्स पूर्णपणे तयार असल्याने त्यांचा ताबा देण्यास विलंब होणार नाही. ही योजना नागरिकांना शहरात घर देण्याचे स्वप्न साकार करण्याची संधी आहे.’ या गृहनिर्माण संकुलांना रेल्वे, रस्ते आणि मेट्रोद्वारे कनेक्टिव्हिटी असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. (हेही वाचा; Ladka Shetkari Abhiyan: आता राज्यात राबवले जाणार ‘लाडका शेतकरी अभियान’; CM Eknath Shinde यांची घोषणा)
सिडको गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे-
मिळकत दाखल्याचे प्रमाणपत्र
अधिवास प्रमाणपत्र
आधार कार्ड
पॅन कार्ड
मतदार ओळखपत्र
दरम्यान, मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत 2,030 युनिट्सच्या विक्रीसाठी म्हाडाची वेबसाइट https://housing.mhada.gov.in आणि मोबाइल ॲपद्वारे ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि मंजुरी प्रक्रिया 9 ऑगस्ट 2024 पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 सप्टेंबर रोजी रात्री 11.45 वाजेपर्यंत आहे. म्हाडा लॉटरी 2024 चा निकाल 13 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता जाहीर केला जाईल.