महाराष्ट्रातील चिपळूण, रत्नागिरी येथे काल भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या ताफ्यावर अज्ञातांनी दगडफेक केली. शिवसेना यूबीटी नेते आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर शिवसेना यूबीटी गटाचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यामध्ये हाणामारी झाल्यानंतर ही घटना घडली. अधिकाऱ्याने सांगितले की काही कारचे नुकसान झाले होते. आमदार भास्कर जाधव व निलेश राणे यांचे कार्यकर्ते भिडल्यानंतर दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांना अश्रूधुरांचा वापर करावा लागला होता. याप्रकरणी आता जवळपास 400 जणावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सात पदाधिकाऱ्यांना चिपळूण पोलिसांनी कालअटक केली आहे. (हेही वाचा - Maharashtra: चिपळूणमध्ये माजी खासदार निलेश राणे यांच्या ताफ्यावर दगडफेक, कठोर कारवाईचे आदेश)
चिपळूण येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी शहनवाज शिरळकर, फैयाज शिरळकर, हेमंत मोरे यांना अटक अटक करण्यात आली आहे. दरम्यान, शुक्रवारी हा सगळा प्रकार घडण्यापूर्वीच पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी भाजपच्या दोन प्राधिकार्यांना नोटिसा बजावल्या होत्या. घटनेनंतर या सगळ्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी चिपळूण पोलिसांकडून सुरू असून गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची शोध मोहीम सुरू केली.
या घटनेनंतर 400 जणांच्या जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 10 ते 12 कलमे पोलिसांनी लावली आहेत आयपीसी 143, 145, 147, 149, 160, 337, 353, 504, 506 या कलमान्वये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सरकारी कामात अडथळा, दोन गटात हाणामारी, शिवीगाळ आणि शारीरिक दुखापत या संदर्भात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.