Chipi Airport Update: सिंधुदुर्ग मधील चिपी एअरपोर्ट यंदा गणेशोत्सव पूर्वी सुरु होण्याचे खासदार विनायक राऊत यांचे संकेत
विनायक राऊत (फोटो सौजन्य-फेसबुक)

कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी आता रेल्वे, रस्ते मार्गांसोबतच विमान प्रवास देखील सुरू आहे. मागील अनेक महिन्यांपासून कोकणवासियांना सिंधुदुर्ग मधील चिपी विमानतळाची (Chipi Airport) प्रतिक्षा आहे. आता सार्‍या गोष्टी जवळपास पूर्ण झाल्याने यंदा गणेशोत्सवासाठी चाकरमनी विमानाने कोकणात दाखल होऊ शकतात अशी स्थिती आहे. खासदार विनायक राऊत यांनी दिलेल्या माहितीसाठी प्रवासी वाहतुकीचे लायसन्स मिळताच 8 दिवसात विमानसेवा सुरू होऊ शकते त्यामुळे गणपतीला यंदा अनेकजण विमानाने कोकणात दाखल होण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

मीडीयाशी बोलताना विनायक राऊतांनी दिलेल्या माहितीमध्ये चिपी विमानतळाच्या धावपट्टीचे काम विमानतळ प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली योग्य प्रकारे पूर्ण झाले आहे. 28 जूनला या कामाचा आहवाल आयआरबी कंपनीने नागरी उड्डाण महासंचालनालय (डीजीसीए) पथकाकडे दिला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून हिरवा कंदील कधीही मिळू शकतो. विमानतळावर कंपनीचे कर्मचारी तैनात आहेत, तिकीटघारंसाठी कर्मचारी आहेत. त्यामुळे गणपती पूर्वी नक्कीच विमानतळ सुरू होऊ शकतं असा त्यांचा विश्वास आहे. चिपी विमानतळाबद्दल '८' खास इंटरेस्टिंग गोष्टी.

दरम्यान यावर्षी कोरोनाच्या सावटाखाली देखील कोकणात गणपती जाणार्‍या किशेष रेल्वेचं देखील बुकिंग हाऊसफुल्ल आहे तर प्रतिक्षायादी देखील भली मोठी आहे. दरवर्षी शिमगा, गणेशोत्सव आणि उन्हाळी सुट्ट्यांत कोकणात येणार्‍यांची संख्या मोठी आहे.