CM Uddhav Thackeray (Photo Credits: Facebook)

'मुंबईत आज MMRDA म्हणजेच महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वेगवेगळ्या विकास कामांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रोच्या 2 ए आणि 7 या मार्गिकेच्या चाचण्यांचा शुभारंभ केला. या कार्यक्रम सोहळ्याला जात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रस्त्यांवरील लोकांची गर्दी निदर्शनास आली. ते पाहून मुख्यमंत्र्यांना धक्काच बसला. मुंबईतील ही गर्दी पाहून चिंता व्यक्त करत मुंबईतील निर्बंध कडक करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 30 मे पर्यंत राज्यात ठेवण्यात आलेला लॉकडाऊन 15 जूनपर्यंत लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) वाढवण्यात आला आहे. यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, मास्क वापरा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांनी जनतेला केलं आहे. असं असताना देखील मुंबईच्या रस्त्यांवरील गर्दी पाहून मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे.हेदेखील वाचा- Mumbai Metro: मुंबई मेट्रो 2A , 7 चाचणीस सुरुवात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

'मी कालच जनतेशी संवाद साधला होता. काही ठिकाणी निर्बंध सुद्धा कमी केले आहे. आज रस्त्यावर पाहिलं तर सर्वत्र गर्दी दिसून येत आहे. मुंबईकर कोणतेही नियम पाळताना दिसत नाही. त्यामुळे मुंबईत आणखी कडक निर्बंध लागू करावे लागतील', असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी दिला.

मुंबई शहरातील बहुचर्चित मेट्रो (Mumbai Metro) प्रवासाचा दुसरा टप्पा पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत या टप्प्याच्या चाचणीस आजपासून (सोमवार, 31 मे) सुरुवात झाली. डहाणूकरवाडी ते आरे मेट्रो स्टेशनदरम्यान ही चाचणी पार पडले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRDA) ही चाचणी करत आहे. मुख्यमंत्री आणि महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमडळातील प्रमुख मंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रो चाचणीस हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या कार्यक्रमासाठी आकुर्ली स्थानकात विशेष आयोजन करण्यात आले होते.