Violence in Sambhajinagar (Photo Credit- Twitter/@ANI)

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरातील किराडपुडा (Kiradpura) परिसरात दोन गटांमध्ये मध्यरात्री एकच्या सुमारास जोरदार राडा झाला. राम मंदिर परिसरात रामनवमीची (Ram Navmi 2023) तयारी सुरु असतानाच दोन्ही गटात हा राडा झाल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्मण झाले आहे. पोलिसांनी (Aurangabad Police) तातडीने कारवाई करत जमावाला काबूत आणले परंतू दरम्यानच्या काळात जमाव हिंसक झाला. जमावाने पोलीस वाहनांसह इतर खासगी 13 चारचाकी वाहने जाळली. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार आणि अश्रुधुराचा मारा करावा लागला. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी हवेत 12 राऊंड फायर केले.

जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी कडक कारवाई केली. या कारवाईदरम्यान काही पोलीस जखमी झाल्याचे वृत्त आहे. रामनवमीची तयारी सुरु असताना अज्ञात जमावाकडून मंदिराच्या प्रवेशद्वारावर हल्ला केला. त्यातून वाद वाढत गेला आणि अचानक तणावाची परिस्थिती उद्भवल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच तातडीने पावले टाकत कडक कारवाई करण्यात आली. (हेही वाचा, Viral Video: कर्जाचे हफ्ते थकवल्याने फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दुचाकीवरचं उचलून नेली बाईक; पहा व्हिडिओ)

छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये असलेल्या किऱ्हाडपुरा परिसरातील राम मंदिरातही जोरदार तयारी सुरु करण्यात आली होती. दरम्यान, रात्री बारा वाजण्याच्या सुमारास दोन गटात काही कारणावरुन वाद झाला. या वादातून बाचाबाची वाढत गेली त्याचे पर्यावसन मोठ्या भांडणात झाले. अखेरीस दोन्ही गटात मोठा राडा झाला. दोन्ही गटांनी परस्परविरोधी आणि एकमेकांना चिथावणीकोर भाषा वापरत घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आझाद चौक ते सिटी चौक दरम्यान कुमक तैनात करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

ट्विट

दरम्यान, शहरामध्ये परिस्थिती नियंत्रणात असून शांतता प्रस्थापित झाली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे अवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच, समाजकंटकांवर कडक कारवाईचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.