विठ्ठल मंदिर पंढरपूर (Photo credit : Youtube)

महाराष्ट्रात आलेली कोरोनाची दुसरी लाट परतवून लावण्यासाठी राज्य सरकारसह संपूर्ण आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाचे कडक निर्बंध लागू करण्यात आले असून या नियमांचे नीट पालन होत आहे की नाही यावर सरकारची करडी नजर आहे. दरम्यान राज्य सरकारच्या 'ब्रेक द चेन' या अभियानाला पाठिंबा देत पंढरपूरात (Pandharpur) येत्या 23 एप्रिल ला होणारी चैत्री यात्रा (Chaitri Yatra) रद्द करण्यात आली आहे. तसेच पंढरपूरमध्ये पोटनिवडणुकीच्या आचारसंहिता लागू असल्याने मंदिर समितीने हा निर्णय गेतला आहे.

ABP माझाने दिलेल्या वृत्तानुसार, यात्रा काळात मंदिरात सर्व धार्मिक विधी पार पडतील. मात्र एकाही भाविकाला 30 एप्रिलपर्यंत मंदिरात दर्शन घेता येणार नाही.हेदेखील वाचा- Nashik: चिंताजनक! नाशिक शहरात एकाच दिवशी 9 जणांचा चक्कर आल्याने मृत्यू

दरम्यान मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून जगभरातील भाविकांना देवाचे 24 तास दर्शन घेता येणार असल्याने भाविकांनी बसूनच चैत्रीचा सोहळा साजरा करावा असे आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी केले आहे.

कोरोनाचे राज्य सरकारने घालून दिलेले नियमांचे काटेकोर पालन करीत एकादशीचा कोर्टानं सोहळा देखील मंदिर कर्मचारीच करणार आहेत . पंढरपुरातील प्रमुख चार यात्रांपैकी चैत्री सोहळा असून या सोहळ्याला प्रामुख्याने मुंबई , कोकण , कोल्हापूर आणि कर्नाटक भागातील हजारो भाविक येत असतात. मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्याने पंढरपूरात ही यात्रा रद्द करण्यात आली आहे.

दरम्यान मुंबईच्या हाफकिन संस्थेस (Haffkine Institute) भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन (Covaxin) बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली असल्याची माहिती समोर येत आहे. ही राज्यासाठी खूपच चांगली वार्ता आहे. आपल्या विनंतीचा स्वीकार करून केंद्र शासनाने ही परवानगी दिल्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरु होऊ शकते असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे आभार मानले आहेत.