Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

रेल्वेमार्गाच्या विविध कामांसाठी तसंच कुर्ला-शीव पुलाच्या कामामुळे शनिवार-रविवार (16-17 मार्च) दरम्यान मध्य रेल्वेमार्गावर पावर  ब्लॉक घेण्यात आला आहे. याचा परिणाम लोकल सोबतच लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरही होणार आहे. त्यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आले आहेत.

आंबवली येथील FOB गर्डर टाकण्याचे काम चालू असल्याने कल्याण-टिटवाळा दरम्यान पावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. याचा परिणाम पुढील गाड्यांवर होणार आहे.

11093 सीएसएमटी-वाराणसी महानगरी एक्स्प्रेस आणि 12167 एलटीटी-वाराणसी एक्स्प्रेस या दोन गाड्या आपल्या नियमित वेळेपेक्षा सुमारे तासभर उशिराने धावत आहेत.

त्याचप्रमाणे आंबवलीच्या पावरब्लॉकमुळे खालील गाड्या नियमित वेळेपेक्षा सुमारे 40-60 मिनिटे उशिराने धावतील.

11062 दरभंगा-एलटीटी एक्स्प्रेस

11058 अमृतसर-सीएसएमटी एक्स्प्रेस

12541 गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस

11016 एलटीटी-खुशीनगर एक्स्प्रेस

18030 शालिमार-एलटीटी एक्स्प्रेस

मध्य रेल्वे मार्गावरील पावर ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून याचा परिणाम लोकलवर देखील झाला आहे.