मुंबई लोकल ट्रेन (Photo Credits: PTI)

आठवड्याच्या सुरुवातीलाच मध्य रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्ये रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.

सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद आणि धीम्या दोन्ही गतीच्या गाड्या तब्बल 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. कांजूरमार्ग स्टेशनवर सीएसएमटी-कल्याण लोकलमध्ये झालेल्या बिघाडामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.  कुर्ला-मुलुंड दरम्यान धीम्या गतीच्या गाड्या जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. यामुळे ऐन कामावर जाण्याच्या वेळेस हा खोळंबा झाल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत. मात्र नेमका काय बिघाड झाला याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

रविवारी (18/11/2018) ठाकुर्ली-कल्याणदरम्यानचा पत्री पूल पाडण्याचे काम सुरु असल्यामुळे मुंबईकरांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर सकाळी 9.30 ते दुपारी 3.30 या काळासाठी जम्बो मेगॉब्लॉक घेण्यात आलाआहे. पाडकामामुळे लोकलसह मेल-एक्सप्रेस ठप्प झाल्याने स्थानकांत प्रवाशांची एकच गर्दी झाली होती.