रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था झालेल्या मध्य रेल्वेने आज सकाळची सुरुवातच समस्यांनी केली आहे. कुर्ल्याजवळील तांत्रिक यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून अप-डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा उशिराने सुरु आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांना आठवड्याच्या सुरुवातीला अनेक समस्यांचा सामन करावा लागत आहे. समस्यांचे माहेरघर झालेल्या मध्य रेल्वेच्या या अनागोंदी कारभारामुळे पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनावर प्रवाशांची आगपाखड होत आहे.
नोकरी जाणा-या मुंबईकरांचा आठवड्याचा पहिला दिवस आज फारसा चांगला नसल्याचे पाहायला मिळत आहे. ऐन गर्दीच्या वेळी कुर्ल्याच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. याचा परिणाम म्हणून दोन्ही अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
हेही वाचा- खुशखबर! मुंबई लोकल चे पर्यटक तिकीट घेऊन, तिन्ही लाईन्सवर हवा तेव्हा प्रवास करता येणार
ऐन गर्दीच्या वेळी अशी समस्या निर्माण झाल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाल्याने प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हे तांत्रिक समस्या ठिक होईपर्यंत मध्य रेल्वे प्रवाशांचे आज प्रचंड हाल होताना दिसत आहेत.