Loksabha Election 2024: लोकसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान सुरु आहे. नेत्यांकडून आजही पक्षासाठी प्रचार प्रसार केला जात आहे. यातच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर राजकारणात एक खळबळ उडाली आहे. शुक्रवारी वर्धा येथील हिंगणघाट पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आला होता आणि तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. (हेही वाचा- काँग्रेस नेते Naseem Khan यांचा पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून राजीनामा)
मिळालेल्या माहितीनुसार, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक अनिल देशमुख यांनी आदर्श आचार संहितेचे उल्लघंन केले होते त्यामुळे विरोधाकांकडून तक्रार दाखल करण्यात आला होता. अनिल देखील हे महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांचे मामा आहेत. त्यांच्या प्रचाराची जबाबदारी अनिल देशमुख यांच्यावर आहे. बाहेर जिल्ह्यातील नेत्यांना मतदारसंघातून जाण्याचे आदेश असताना देखील अनिल देशमुख शुक्रवारी वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या हिंगणघाट येथे भेट दिली. काल त्यांनी साडेचार ते पावणे पाच दरम्यान देशमुख यांनी हिंगणघाटच्या नंदोरी चौकातील गावकऱ्यांची भेट घेतली होती.