मुंबई-गोवा आलिशान क्रुजवर लग्न

मुंबई -गोवा दरम्यान शनिवारपासून बहुप्रतिक्षितआलिशान क्रुज सेवा सुरू करण्यात आली आहे. क्रुज 'अंग्रिया' ही मुंबई ते गोव्या दरम्यानचा प्रवास 16 तासामध्ये पूर्ण करते. नुकताच या आलिशान क्रुजवर विवाहसोहळा संपन्न झाला आहे. कॅप्टन इअरविन सिक्वेरा यांनी क्रुजवर एका जोडप्याचं लग्न लावून दिलं. क्रुजवर लग्न करण्यापूर्वी या जोडीने कोर्टात लग्न केले होते.

मागील 15 वर्षांमध्ये 60 हून अधिक जहाजांवर कॅप्टन सिक्वेरा होते. एक कॅप्टन असण्याच्या नात्याने त्यांना जोडप्याचं समुद्रात क्रुजवर लग्न लावण्याचा अधिकार आहे. त्यानंतर कोर्टामध्ये तसे प्रमाणपत्र सादर करून लग्नाला मंजुरी दिली जाते.

मुंबईत नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी डोमेस्टिक क्रुज टर्मिनलचं उद्घाटन केलं होते. त्यावेळेस यामधून पुढील पाच वर्षांमध्ये सुमारे दीड लाख तरूणांना रोजगार मिळेल असे सांगण्यात आले आहे. मुंबई -गोवा ही भारतातील पहिली लक्झरी क्रुज लाइनर आहे.

मुंबई -गोवा दरम्यान सुरू करण्यात आलेल्या  क्रुज लायनरमधून प्रवास करण्यासाठी www.angriyacruises.com या वेबसाईटवर तिकीट बुक करू शकता. आंग्रियामध्ये डॉरमेट्रीसाठी प्रतिव्यक्ती 6 हजार रूपये तिकीट आहे. तर कपल रूम 10,000 रूपयांमध्ये उपलब्ध आहे. संपूर्ण क्रुजवर 8 विविध श्रेणी आहेत. तसेच क्रुजवर 104 विविध खोल्या आहेत.