Bandra Worli C Slink Accident PC X

Mumbai Accident: मर्सडिज आणि बीएमडब्यूच्या शर्यतीत कॅबचा अपघात (Accident) झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या अपघाताप्रकरणी पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल केला असून दोन्ही चालकाला ताब्यात घेतले आहे. हा अपघात मुंबईतील वांद्रा - वरळी सी लिंकवर घडला. या अपघातानंतर दोन्ही चालकावर प्रवाशांनी संताप व्यक्त केला.  (हेही वाचा- मध्य प्रदेशातील धवरी धरणात दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू)

मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रा वरळी सी लिंकवर मर्सडिज आणि बीएमडब्यू यांच्यात शर्यत झाली होती. या शर्यतीत कॅब उलटली. या अपघातात प्रवाशी थोडक्यात वाचले. अपघातामुळे रस्त्यावर बराच वेळ गोंधळ परिस्थिती निर्माण झाली होती. वांद्रा वरळी सी लिंकवर मर्सडिजसोबत रेसिंग करत असताना बीएमडब्यूचे नियंत्रण सुटले त्यामुळे कार पुढे असणाऱ्या कबला धडकली. या धडकेत कॅब संपुर्ण पलटली. पण सुदैवाने प्रवाशी थोडक्यात वाचले. कॅबमध्ये एक कुटुंब प्रवास करत होते.

वांद्रा वरळी सी लिंक अपघात 

या अपघात प्रकरणी पोलिसांना घटनेची तात्काळ माहिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही कारच्या चालकांना अटक केले. दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शाहबाज खान (31) आणि तारिक चौधरी (29) असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. हा अपघात सकाळी १०.३०च्या सुमारास घडला. अपघातामुळे रस्त्यावर भीतीचे वातावरण पसरले होते.