मालाड (Malad) पश्चिम येथे सोमवारी सकाळी एका 37 वर्षीय व्यावसायिकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. एका सुसाईड नोटमध्ये, त्याने 25 लाख रुपयांच्या एकत्रित कर्जाची (Loan) परतफेड करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल त्याच्या कर्जदारांची माफी मागितली. सौरभ पिटले असे मृताचे नाव असून तो सुशिक्षित असून तो पत्नी आणि सहा वर्षाच्या मुलासह फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होता. गेल्या पाच-सहा वर्षांपासून तो मोटार पार्ट्स विकत होता. कोविड-19 लॉकडाऊन (Lockdown) दरम्यान त्याला त्याच्या व्यवसायात अधिक नुकसान झाले होते. पिटले यांच्यावर नैराश्याचा उपचार सुरू आहे का, असे विचारले असता एका पोलीस अधिकाऱ्याने नकारार्थी उत्तर दिले. हेही वाचा Sameer Wankhede Case: समीर वानखेडेंना मोठा झटका, ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून हॉटेल आणि बारचा परवाना रद्द
पिटले यांनी 12 पानांची सुसाईड नोट मागे सोडली, ज्यामध्ये त्यांनी सहा ते सात कर्जदारांकडून घेतलेल्या कर्जांची यादी केली होती. त्यांनी वैयक्तिकरित्या त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाचीही माफी मागितली. बांगूर नगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद तावडे म्हणाले, आम्ही अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.