Bus Services on Mumbai Trans Harbor Link: पुढील आठवड्यापासून NMMT अटल सेतूवर सुरु करणार बस सेवा; जाणून घ्या दर, मार्गासह इतर माहिती
Sea Link | Representational & Edited Image (Photo Credits: Pixabay)

Bus Services on Mumbai Trans Harbor Link: नवी मुंबई म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट (NMMT) ने सोमवारी जाहीर केले की, नवी मुंबई मधील रहिवासी लवकरच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) ते मुंबई अशा सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ घेऊ शकतील. एनएमएमटीचे व्यवस्थापक योगेश कडूसकर म्हणाले की, त्यांनी अटल सेतूवरून धावणाऱ्या ते किमान चार सेवांची योजना आखली असून दोन वातानुकूलित इलेक्ट्रिक बस या पुलावरून धावतील. याआधी जानेवारीमध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते अटल सेतूचे उद्घाटन झाले. त्यानंतर या पुलावरून सार्वजनिक वाहतुकीची प्रतीक्षा होती ती लवकरच संपणार आहे.

पहिल्या सेवेसाठी, बस क्रमांक 115 ही गाडी सज्ज आहे. एनएमएमटीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 'बस क्रमांक 115 ही वातानुकूलित सेवा आहे आणि ती खारकोपर ते मंत्रालयापर्यंत धावते. मात्र, रहिवाशांची मागणी लक्षात घेऊन, ही सेवा आता नेरळ येथून सुरू होईल आणि अटल सेतू मार्गे धावेल. अहवालानुसार, नेरुळ ते मंत्रालय या 52 किमीच्या प्रवासासाठी भाडे 90 रुपये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा: Block on Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उद्या मेगाब्लॉक; हलक्या आणि जड वाहनांसाठी 'हा' असेल पर्यायी मार्ग)

ही बस सेवा पुढील आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र टोल आकारण्याबाबत अनिश्चितता कायम आहे, कारण अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले की, सार्वजनिक वाहतूक सेवांना खाजगी बसेससारखा जास्त टोल भरावा लागेल की नाही किंवा त्यांना टोल शुल्कात सवलत किंवा सूट मिळेल हे स्पष्ट नाही. एनएमएमटी 74 मार्गांवर सुमारे 567 बस चालवते, ज्यामुळे दररोज सुमारे 1.80 लाख प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्यास मदत होते. एनएमएमटी ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली, उरण, खोपोली इत्यादी आसपासच्या शहरांना देखील सेवा प्रदान करते.

दरम्यान, डिसेंबर 2016 मध्ये अटल सेतू पुलाची पायाभरणीही पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आली होती. अटल सेतू दक्षिण मुंबईला नवी मुंबईशी जोडेल आणि लोक हे अंतर 20 मिनिटांपेक्षा कमी वेळेत पार करू शकतील. हा 21.8 किलोमीटर लांबीचा 6 लेन रोड ब्रिज आहे. त्याचा 16.5 किमी लांबीचा भाग मुंबईच्या समुद्राच्या वर आहे आणि 5.5 किमीचा भाग जमिनीच्या वर आहे.