Buldhana Accident: अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक, सासू-सासरे अन् सुनेचा दुर्दैवी अंत
Accident (PC - File Photo)

बुलढाणा खामगाव रोडवर (Buldhana Accident News) अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील सासू, सासरे अन् सुनेचा दुर्देवी अंत झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बुलढाणा (Buldhana) शहराजवळ भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.एका अज्ञात वाहनाने दुचाकीवरील तिघांना चिरडल्याने हा भयंकर अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीवरील सासू सासरे अन् सुनेचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. बुलढाणा खामगाव रोडवरील भादोलाजवळील पोखरी फाट्यावर ही घटना घडली. (हेही वाचा - चेंबूर मध्ये मध्यान्ह भोजनानंतर 16 विद्यार्थ्यांची बिघडली प्रकृती; मळमळ, उलट्यांचा त्रास झाल्याने हॉस्पिटल मध्ये दाखल)

सुदैवाने या अपघातात दुचाकीवरील सहा वर्षांच्या मुलाचा जीव वाचला. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मुलाला रुग्णालयात दाखल केले. भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा हा दाखल करुन घेतला आहे.  पोलिस सध्या परिसराकील सीसीटीव्हीच्या आधारे या घटनेचा तपास हा करत आहे. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर आरोपील पकडण्याची शक्यता वर्तवली आहे.