Food Poisoning | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

चेंबूर (Chembur) मध्ये पालिकेच्या शाळेमध्ये मध्यान्ह भोजनानंतर (Mid Day Meal) 16 विद्यार्थी आजारी पडल्याची घटना समोर आली आहे. ही घटना 13 ऑक्टोबरची आहे. शुक्रवारी सकाळी शाळेत जेवल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला. तातडीने या मुलांना गोवंडीच्या शताब्दी हॉस्पिटल (Shatabdi Hospital Govandi) मध्ये नेण्यात आले. सध्या या 16 विद्यार्थ्यांची प्रकृती ठीक असल्याचं सांगण्यात आलं आहे.

नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना सकाळच्या वेळेत जेवण देण्यात आले. आणिक गाव भागात ही शाळा आहे. सकाळी 10 च्या सुमारास त्यांना जेवण देण्यात आले होते. नेहमीप्रमाणे ही खिचडी होती. पण जेवणानंतर सहावी आणि सातवी च्या विद्यार्थ्यांना मळमळ जाणवायला लागली. काहींना उलट्यांचा त्रास सुरू झाला.

बीएमसीच्या शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांना जेवण देण्यापूर्वी शिक्षकांनी त्याची चव चाखली होती. पण काही विद्यार्थ्यांना ही खिचडी खाल्याने त्रास झाला. उलट्या, मळमळ, अस्वस्थता जाणवायला लागली. तातडीने या मुलांना सुरूवातीला जवळच्या डिस्पेंसरी ला नंतर शताब्दी हॉस्पिटलला नेण्यात आले.

शाळेचे मुख्याध्यापक सिंधू दवारे यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, 'सार्‍या विद्यार्थ्यांची प्रकृती ठीक आहे. सध्या त्यांचे पालक त्यांच्यासोबत आहेत. कोविड नंतर शाळा पुन्हा सुरू झाल्यापासून जी संस्था जेवण पुरवते त्याच संस्थेकडून शुक्रवारी देखील जेवण देण्यात आले होते. एकूण 189 विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्ली पण अन्य मुलांना त्रास झाला नाही'.

शांताई महिला औद्योगिक गृह नावाचा परिसरातील महिला स्वयं-सहायता गट या आणि परिसरातील सुमारे 20 शाळांना दुपारचे जेवण देते. संस्थेच्या स्वयंपाकघरातील कच्च्या तसेच शिजवलेल्या अन्नाचे नमुने बीएमसीच्या शिक्षण विभागाने पुढील तपासणीसाठी पाठवले आहेत.  Snake in Mid Day Meal: मुलांना देण्यात येणाऱ्या माध्यान्ह भोजनात आढळला 'साप'; 30 हून अधिक मुले रुग्णालयात दाखल .

गोवंडी शताब्दी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ सुनील पाकडे यांनी पुष्टी केल्यानुसार दाखल झालेल्या सर्व शालेय विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. ते पुढे म्हणाले, “भात आणि मिश्र भाज्या असलेले जेवण खाल्ल्यानंतर सकाळी 11.30 च्या सुमारास मुलांना रुग्णालयात आणण्यात आले. आम्ही त्यांच्यावर उपचार केले आहे. दरम्यान त्यांनी विष प्राशन केले आहे की नाही हे तपासण्यासाठी आम्ही पोटातील सामग्रीचे नमुने पाठवले आहेत."