Photo Credit- X

RSS Chief Mohan Bhagwat: देशात राम मंदिरानंतर आता मंदिर मशिदीचा मुद्दा सातत्याने सामाजिक वातावरण बिघडवताना दिसत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत (RSS chief Mohan Bhagwat) यांनी मंदिर-मशिदीच्या प्रश्नांवर चिंता (Mandir Masjid Vivad)व्यक्त केली आहे. राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) बाधणारा माणूस हिंदूंचा नेता होऊ शकत नाही, असे विधान त्यांनी केले आहे. मोहन भागवत बिधडत्या सामाजिक प्रश्नांवरही भाष्य केले आहे.

पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत म्हणाले की, राम मंदिरानंतर आता काही लोकांना वाटते की नवीन ठिकाणी असेच मुद्दे उपस्थित करून ते हिंदूंचे नेते होऊ शकतात. हे अस्वीकार्य आहे. दररोज एक नवीन प्रकरण समोर येत आहे. याची परवानगी कशी देता येईल? हे असे चालू राहू शकत नाही, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. (RSS Chief Mohan Bhagwat: सर्व हिंदूंनी एकत्र यावे; आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांचे अवाहन)

एकत्र राहण्याचा आदर्श मांडण्याची गरज

सर्वसमावेशक समाजाचा पुरस्कार करताना मोहन भागवत म्हणाले की, देश सद्भावनेने जगू शकतो हे जगाला दाखवण्याची गरज आहे. याचे मॉडेल तयार करण्याची गरज आहे. नाताळ हा सण रामकृष्ण मिशनमध्येही साजरा केला जातो कारण ते हिंदू आहेत. आपला देश संविधानाने चालतो. जे निवडून येतील ते राज्य चालवतील. इंग्रजांच्या कारस्थानामुळे पाकिस्तान निर्माण झाला. ज्याची त्याची पूजा ज्याला त्याला लकलाभो पण नियम पाळले गेले पाहिजे. यावेळी त्यांनी भारत हे सनातनी राष्ट्र असल्याचा पुनरूच्चार केला.'

राम मंदिर हे हिंदूंच्या श्रद्धेशी जोडलेले

मोहन भागवत पुढे म्हणाले की, उत्तर प्रदेशातील अयोध्येत श्री राम मंदिर बांधले गेले कारण हा हिंदूंच्या श्रद्धेचा विषय होता. यादरम्यान आरएसएस प्रमुखांनी कोणत्याही मंदिर किंवा मशिदीचे नाव न घेता सांगितले की, आता जे नवीन वाद निर्माण होत आहेत त्यांना परवानगी कशी दिली जाऊ शकते.