Muharram Representative Image (Photo credit: IANS)

जगभरात हाहाकार माजविलेल्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) सण-व्रत वैकल्यांनी भरलेल्या भारताला मात्र ग्रहण लावले. यामुळे 2020 मध्ये अनेक सणांचा उत्साह म्हणावा तसा दिसला नाही. यातच मुस्लिम बांधवांचा मोहरम हा सण. मुस्लीम बांधवांच्या हिजरी कॅलेंडरमधील (Hijri Calendar) पहिला महिना मोहरम (Muharram)म्हणून ओळखला जातो. या सणानिमित्त निघणा-या मिरवणुकीला सोशल डिस्टंसिंगचा विचार करता मुंबईत बंदी घातली होती. मात्र यावर याचिका दाखल केल्यानंतर याचा सर्व बाजूंनी विचार करता मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court)  या मातम मिरवणूकीला परवानगी दिली आहे. मात्र त्यासाठी काही नियम घातले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाने मोहरम संदर्भात दिलेल्या आदेशानुसार, मुंबईत केवळ 5 लोकांनाच या मिरवणुकमध्ये सहभागी होण्याची परवानगी आहे. त्यासोबतच महाराष्ट्रातील अन्य राज्यात यावरील बंदी कायम राहणार आहे असेही सांगण्यात येत आहे. Muharram 2020: महाराष्ट्र सरकारने जाहीर केल्या 'मोहरम' बाबत मार्गदर्शक सूचना; यंदा मातम मिरवणूकीला परवानगी नाही

मोहरम महिन्यात पहिल्या दहा दिवसांमध्ये जगभरात शिय्या (Shia) आणि सुन्नी (Sunni) पंथातील मुस्लिम बांधव प्रार्थना करतात. या महिन्यात इमाम हुसेन यांच्या हौताम्याचं स्मरण केले जाते. इस्लाम धर्मीयांच्या इतिहासामध्ये Battle of Karbala हा अत्यंत क्लेषकारक प्रसंग मानला जातो. या लढाईतच हुसेन यांना त्यांच्या साथीदारांसोबत हौतात्म्य आलं होतं. त्याची आठवण काढत मोहरमच्या पहिल्या 10 दिवसांत प्रार्थनांचं आयोजन शिया आणि काही सुन्नी पंथातील मुस्लीम बांधवांकडून केले जाते.