मुंबई महानगरपालिकेने (Mumbai Municipal Corporation) आज (मंगळवार, 30 मार्च) एक मोठा निर्णय घेतला आहे. महानगरपालिका हद्दीमधील प्रॉपर्टी टॅक्स (Property Tax) न भरणाऱ्या सांडपाण्याची लाईन (Sewage lines) बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यापूर्वी प्रॉपर्टी टॅक्स न भरणाऱ्या घरांच्या पाण्याच्या पाईपलाईन बीएमसीकडून (BMC) बंद केल्या जात होत्या. परंतु, आता यासोबतच सांडपाण्याची लाईन देखील बंद केली जाईल. (मालमत्ता कर न भरणाऱ्या विरोधात पालिकेचा कठोर कारवाईचा बडगा: कार सोडवण्यासाठी थकबाकीदाराने भरले 50 लाख रुपये)
आज बीएमसीने 4 वेगवेगळ्या प्रॉपर्टीच्या सांडपाण्याच्या लाईन्स बंद केल्या आहेत. यापैकी के पश्चिम वॉर्डमधील एका हॉटेलची मालमत्ता कर थकबाकी 8.70 कोटी इतकी होती. हॉटेल्सना नोटीसेस पाठवून देखील त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे या हॉटेलची सांडपाण्याची लाईन बंद करण्यात आली, अशी माहिती नागरी समितीने दिली आहे. या हॉटेल व्यतिरिक्त अजून तीन प्रॉपर्टीची सांडपाण्याची लाईन देखील बंद करण्यात आली आहे.
आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 5200 कोटी रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स जमा करण्याचा बीएमसीचा टार्गेट होता. परंतु, अजून पर्यंत 4536 कोटी रुपयांचा टॅक्स जमा करण्यात आला आहे. प्रॉपर्टी टॅक्स भरण्यास असमर्थ असणाऱ्या प्रॉपर्टींना डिफ्लॉर्टस लिस्टमध्ये टाकण्याची सुरुवात बीएमसीने फेब्रुवारी महिन्यापासून केली होती. प्रॉपर्टी टॅक्स न भरणाऱ्यांकडून टॅक्स जमा करण्यासाठी ही मोहिम सुरु करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त प्रॉपर्टी टॅक्स न भरणाऱ्या प्रॉपर्टीचा लिलाव देखील बीएमसीने सुरु केला आहे.
संपूर्ण शहरातून अजून पर्यंत 20,000 कोटींचा प्रॉपर्टी टॅक्स येणे बाकी आहे. सध्याच्या कोविड-19 परिस्थितीमुळे नागरि समितीला देखील पैशांची अडचण निर्माण होऊ लागली आहे. मोठमोठ्या बिल्डर्स आणि कंत्राटदारांना टॅक्स संदर्भात काही सवलत देखील बीएमसीकडून देण्यात आली आहे. परंतु, या व्यतिरिक्तही टॅक्स न भरणाऱ्या प्रॉपर्टीचा लिलाव बीएमसीकडून सुरु करण्यात आला आहे.