BMC Office | File Phot

तंदूर रोटी हा अनेक खवय्यांचा आवडीचा प्रकार आहे. मात्र बीएमसी ने आता हॉटेल मालकांना नोटीस बजावत कोळसा तंदुर भट्टी (Charcoal Tandoors) न वापरण्याचे आदेश दिले आहेत. कोळशाच्या तंदुर भट्टी ऐवजी आता इलेक्ट्रिक उपकरणं किंवा सीएनजी, पीएनजी, एलपीजीचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पालिकेच्या नव्या नियमानुसार, मुंबई मध्ये बेकरी, रेस्टॉरंट मध्ये जळाऊ लाकुड वापरता येणार नाही. यासाठी बीएमसी कडून 8 जुलै पर्यंतची मुदत दिली. यानंतर मुंबईत कोठेही जळाऊ लाकडाचा वापर आढळला तर त्याला कठोर कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. यामध्ये परवाना रद्द, दंड, कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

9 जानेवारीच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई मध्ये बीएमसी अंतर्गत येणार्‍या हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांना सूचना देत लाकूड, कोळसा किंवा इतर पारंपारिक इंधन वापरता येणार नाही.

मुंबई मध्ये रेस्टॉरंट, बेकरी आणि धाबाचालकांची संख्या 1 हजार पेक्षा जास्त आहे.यामध्ये बहुतांश चालक हे इलेक्ट्रिक उपकरणाचा वापर करतात. मात्र, अद्यापही जुन्याच पद्धतीचा वापर करणार्‍या धाब्यांवर सर्रासपणे कोळशा भट्टीचाच वापर केला जातो. त्यामुळे, महापालिकेनं त्यांची दखल घेत सक्तीने त्यांना नोटीसा बजावल्या आहेत.