खासगी क्षेत्रात नोकरीसाठी (Private Jobs) मोठी स्पर्धा आहे शिवाय त्या नोकरीची लांब कालवधीची हमी देखील कमी असते. सध्या देशात बेरोजगारीचं प्माण वाढत आहे. म्हणून सरकारी नोकरी (Government Jobs) मिळालेली सर्वोत्तम. पण सरकारी कार्यालयात (Government Office) नोकरीची संधी हवी असल्यास त्यासाठी विशेष प्रवेश परिक्षा द्याव्या लागतात पण आता सरकारी कार्यालयात नोकरीची संधी आहे. तर खासगी नोकऱ्यामध्ये पगारचा मोठा प्रश्न निर्माण होतो नाही मुंबई महापालिकेकडून (BMC) विविध पदांची भरती केल्या जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन (Website Notification) प्रसिद्ध करण्यात आले. तरी यासाठी नोंदणी प्रक्रीया (Registration), शैक्षणिक पात्रता (Educational Qualification), पगार (Payment) किती असेल हे जाणून घेवूया.
मुंबई महापालिकेत सिनियर कन्सल्टंट(Sr. Consultant), ज्युनिअर कन्सल्टंट(Jr. Consultant) अशा विविध पदांची पदभरती केल्या जाणार आहे. ज्युनिअर कन्सल्टंट(Jr. Consultant) पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा दीड लाख रुपये इतका पगार दिला जाणार आहे. तर या पदासाठी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून डीएनडी/एमडी/एमएस पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. तर या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २ लाख रुपये इतका पगार दिला जाणार आहे. तसेच या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून डीएनडी/एमडी/एमएस पर्यंतचे शिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे. (हे ही वाचा:- JEE Advanced Result 2022 Declared: जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा निकाल jeeadv.ac.in वर जाहीर; इथे पहा स्कोअरकार्ड)
२३ सप्टेंबर २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी आपले अर्ज तळ मजला, लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडीकल कॉलेज, बिल्डींग, सायन, मुंबई- ४०००२२ या पत्त्यावर पाठवायचे आहेत. तरी अधिक माहितीसाठी मुंबई महापालिकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. संबंधित पदभरतीसाठी वयोमर्यादा आणि अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ५८० रुपये अर्ज शुल्क भरावा लागणार आहे.