Photo Credit- X

Mumbai Water Cut News: बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)कडून जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. 1,450 मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे जी-उत्तर आणि जी-दक्षिण वॉर्डांमधील अनेक भागांत पाणी पुरवठा होणार नाही(Mumbai Water Cut). परिणामी त्या भागातील नागरिकांनी पाण्याची योग्य ती साठवणूक करून घेणे योग्य राहील. 26 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजल्यापासून 27 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या नियोजित वेळेत हे काम होणार आहे.

या 19-तासात जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम होणार आहे. परिणामी परिसरातील रहिवाशांना संभाव्य पाणी कपातीसाठी तयार राहावे लागेल. आवश्यक तेवढा पाणीसाठी करून घ्यावा असे BMC कडून सांगण्यात आले आहे. त्याशिवाय, साठवून ठेवलेले पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. या उपायांचा उद्देश जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामात नागरिकांची गैरसोय कमी करणे आहे.

बाधित क्षेत्रांची यादी

26 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजल्यापासून 27 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत करी रोड, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, लोअर परळ, यासह जी-दक्षिण भागात पूर्ण पाणीपुरवठा कपातीची अपेक्षा आहे. डेलिसल रोड, आणि बीडीडी चाळ येथे सकाळी 4:30 ते 7:45 या वेळए पाणी पुरवठा होईल. याशिवाय, एनएम जोशी मार्ग आणि बीडीडी चाळ दुपारी 2:30 ते दुपारी 3:00 दरम्यान पूर्ण पाणी कपात असेल.

जी-उत्तरमध्ये प्रभादेवी, आदर्श नगर, पी बाळू मार्ग, हातिसकर मार्ग, मराठे मार्ग, पांडुरंग बुधकर मार्ग, सेनापती बापट मार्ग, एनएम जोशी मार्ग आणि गणपतराव कदम या भागात पाणीपुरवठ्यात ३३ टक्के कपात दिसून येईल. दुपारी 4 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पाणी कपात असेल. याशिवाय, सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, काकासाहेब गाडगीळ मार्ग, सयानी मार्ग आणि भवानी शंकर मार्ग या भागांमध्येही पाणी कपात होईल.