Sanjay Raut, Ram Mandir in Ayodhya (Photo Credit - FB/ANI)

Sanjay Raut On Ram Janmabhoomi Temple Inauguration: अयोध्येतील (Ayodhya) रामजन्मभूमी मंदिराच्या उद्घाटनाच्या (Ram Janmabhoomi Temple Inauguration) भव्य कार्यक्रमापूर्वी शिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर टीका केली आहे. पुढील काही दिवसात भाजप (BJP) निवडणुकीसाठी प्रभू रामच (Lord Ram) त्यांचा उमेदवार (Election Candidate) असेल अशी घोषणा करेल. प्रभू रामाच्या नावावर इतकं राजकारण केलं जात आहे, अशी घणाघाती टीका राऊत यांनी केंद्र सरकारवर केली आहे. यावेळी प्रभू रामाच्या नावाच्या कथित राजकीयीकरणावर त्यांनी चिंता व्यक्त केली.

बाबरी मशीद पाडल्याचा शिवसेनेचा दावा -

तत्पूर्वी बुधवारी, राऊत यांनी बाबरी मशीद पाडण्याची जबाबदारी स्वीकारली. यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, यामागे भाजप किंवा संघ परिवार नसून शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. कोठारी बंधू (राम आणि शरद, त्यांच्या विध्वंसाच्या भूमिकेसाठी पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले) हे शिवसैनिक होते. यावेळी राऊत यांनी भाजपचे तत्कालीन उपाध्यक्ष सुंदरसिंह भंडारी यांच्या वक्तव्याचा संदर्भ दिला. (हेही वाचा -PM Narendra Modi To Visit Ayodhya Today: पंतप्रधन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत विमानतळ, नवीन रेल्वेगाड्यांचे आज उद्घाटन; जाणून घ्या संपूर्ण तपशील)

पहा व्हिडिओ - 

दरम्यान, संजय राऊत यांनी भाजपसाठी इतिहास 2014 मध्ये सुरू होतो, अशी उपहासात्मक टिप्पणी केली. महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांमध्ये संघ परिवाराचा सहभाग नसल्याचा आरोप त्यांनी केला. तथापी, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण नसतानाही राऊत यांनी राममंदिर हे सर्व हिंदूंचे आहे यावर भर दिला. (हेही वाचा, Ayodhya Ram Temple: राम मंदिर उद्घाटनानंतर महाराष्ट्रातून धावणार ‘अयोध्या स्पेशल’ ट्रेन; Shivsena UBT म्हणतात, 'देशातील लोकांचे वास्तविक समस्यांपासून लक्ष विचलित करण्याचा मार्ग')

यावेळी राऊत यांनी रामजन्मभूमी आंदोलनातील शिवसेनेची भूमिका आणि अयोध्येतील नेत्यांची उपस्थिती यावर प्रकाश टाकला. राऊत यांच्या विधानांमुळे महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.