Raju Todsam (Photo Credits: You Tube)

महाराष्ट्रामध्ये यवतमाळ (Yavatmal) येथील आर्णी -केळापूरचे  आमदार राजू तोडशाम(Raju Todsam) आणि त्यांची दुसरी पत्नी यांची भर रस्त्यामध्ये धुलाई करताना एक व्हिडिओ सध्या सगळीकडेच व्हायरल होत आहे. आमदार तोडशाम त्यांची दुसरी पत्नी प्रिया शिंदे (Priya Shinde)सोबत 42 वा वाढदिवस सेलिब्रेट करतानाचा हा व्हिडिओ आहे. सध्या हा व्हिडिओ तुफान चर्चेमध्ये आहे.

राजू तोडशाम त्यांचा वाढदिवस साजरा करताना अचानक त्यांची पहिली पत्नी अर्चना आणि आई काही लोकांसोबत पोहचली. सगळा प्रकार पाहून त्यांच्यावर तोंडसुख घेतले. हा प्रकार पुढे मारझोड करण्यापर्यंत पोहचला. प्रिया शिंदे यांनी हात जोडून माफी मागण्याचा प्रयत्न केला मात्र जमलेल्या लोकांनी तिलाही मारले. पोलिसांच्या मदतीने राजू आणि प्रिया यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर प्रियाला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं.

लोकांकडून न्याय मिळवण्यासाठी एका शाळेत शिक्षकेकडून मागणी करण्यात आली होती. तेथील उपस्थित लोकांनी व्हिडिओ शूट केला असून तो व्हायरल होत आहे. आठ वर्षांपूर्वी राजू आणि अर्चना यांचं लग्न झालं होते. त्यांना लहान मुलं आहेत. 48 तासात न्याय मिळाला नाही तर न्याय मिळवण्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तक्रार करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

भाजपाच्या आदिवासी विंगचे प्रमुख अंकित मैतान यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार पक्षासाठी लाजिरवाणा आहे. राजू तोडशाम यांनी या प्रकारावर आपल्या बाजू मांडली नाही किंवा ते दोषी असतील तर आगामी रॅलीमध्ये पंतप्रधानांसोबत त्यांना व्यासपीठावर बसायला दिले जाणार नाही.