Uddhav Thackeray and Pravin Darekar (Photo Credits: PTI and FB)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला आहे. दरम्यान, विविध विषयांवर भाष्य केले आहे. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज साधलेला संवाद केवळ महाराष्ट्रातील जेनतेचा फक्त भ्रमनिरास करणार होता. या संवादाने जनतेला कोणतीही भरीव गोष्ट मिळाली नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच मराठा विद्यार्थ्यांचे भवितव्याचे काय, नक्की सरकार यासंदर्भात काय करणार आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. या संवादावरून दरेकर यांनी निशाणा साधला आहे. दरेकर म्हणाले की, "एसटी कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावा लागत आहे. या कामगारांची दिवाळी कशी गोड होणार? यापैकी कुठल्याही प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी आजच्या संवादातून दिले नाही. केवळ सामंजस्य करार करून चालणार नाहीत. त्या कराराची अंमलबजावणी जलद गतीने होताना दिसत नाही. शहरातून ग्रामीण भागामध्ये जे चाकरमानी गेले, त्यांचे भविष्य काय? याचा विचारविनियम होताना दिसत नाही. तसेच याबाबत मुख्यमंत्री संवादात काहीही बोलले नाहीत," असा शब्दात प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. हे देखील वाचा- Anvay Naik case: अर्णब गोस्वामी अटक आणि पत्रकारिता यांचा सबंध नाही, अन्वय नाईक प्रकरण आधीच्या सरकारनं दाबलं- जयंत पाटील

तसेच, मुख्यमंत्र्यांनी केवळ भावनिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मंदिरांचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणतात की, ज्या देवाच्या दयेने हे सर्व करतोय तोच देव आज बंदिस्त आहे. त्याला मोकळे करण्याची आवश्यकता आहे. परंतु, त्यावर उद्धव ठाकरे यांनी काहीच भाष्य केले नाही. त्यामुळे त्यांचा संवाद हा केवळ ‘बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात’ आहे, असे म्हणावे लागेल, असेही प्रविण दरेकर म्हणाले आहेत.