BJP | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Maharashtra Legislative Assembly Bypoll Elections 2025: महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर आता राज्यात विधान परिषदेची पोट निवडणूक (Maharashtra Legislative Council Bypoll Elections 2025) पार पडणार आहे. पाच जागांसाठी ही निवडणूक पार पडत असून, भाजप सर्वाधिक तीन जागा लढवणार आहे. भाजप केंद्रीय कार्यालयाने आज यादी जाहीर केली आहे. यामध्ये संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादा राव केचे यांना संधी देण्यात आली आहे. संदीप जोशी हे देवेंद्र फडणवीस यांचे बालपणीचे मित्र असून, त्यांनी राजकारणातही बराच काळ सोबत घालवला आहे.

भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीचा वेळापत्रकही जाहीर केला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या विद्यमान सदस्यांच्या निवडणुकीमुळे ही रिक्त पदे निर्माण झाली आहेत. 10 मार्च 2025 रोजी अधिसूचना जारी झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. (हेही वाचा - Maharashtra Public Safety Bill: विशेष जन सुरक्षा कायदा नेमका काय आहे? विधेयकासाठी विधीमंडळाच्या दोन्ही सदनाच्या सदस्यांची संयुक्त समिती स्थापन)

वेळापत्रकानुसार, उमेदवार 17 मार्च 2025 पर्यंत आपले नामांकन दाखल करू शकतात. विधान परिषदेच्या पोट निवडणूकीसाठी 27 मार्च 2025 रोजी मतदान होईल. तसेच याच दिवशी मतमोजणी होईल आणि त्यानंतर लवकरच निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधान परिषदेत आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणि राज्यात आपले राजकीय वर्चस्व आणखी बळकट करण्यासाठी भाजपसाठी पोटनिवडणुकीकडे एक महत्त्वाची घटना म्हणून पाहिले जात आहे.