Sanjay Raut| Photo Credits: Twitter/ ANI

भारतामध्ये सध्या कोविड 19 संकटामध्ये बिहार विधानसभा निवडणूकीची (Bihar Assembly Elections 2020)  रणधुमाळी सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. तर पुढील 2 टप्प्यांत आता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मतदान होईल. पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बोलताना तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांचं कौतुक केले आहे. बिहारचे मुख्यमंत्री तेजस्वी यादव झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही' असे ते म्हणाले आहेत. दरम्यान त्यांच्यामागे सध्या पाठबळ नाही. घरातली व्यक्ती सध्या जेलमध्ये आहे. यादव कुटुंबाच्या मागे इन्कम टॅक्स, सीबीआयचा ससेमिरा लावलाय. तोच तरुण मुलगा आज लाखोंच्या सभा घेतोय, केंद्रीय सत्तेला आव्हान निर्माण करतोय. मला वाटतं बिहारच्या निवडणुकीचं चित्र पाहता उद्या तेजस्वी यादव बहुमताने बिहारचे मुख्यमंत्री झाले तर मला अजिबात आश्चर्य वाटणार. जनभावना महत्त्वाची आहे ती दाबता येत नाही.' असे संजय राऊत म्हणाले आहेत. मात्र यानंतरच त्यांनी 'जर निवडणूकीमध्ये मतदान प्रक्रियेमध्ये काही घोळ झाला नाही तर' असं म्हणत हळूच चिमटादेखील काढला आहे.

दरम्यान तेजस्वी यादव हे माजी केंद्रीय मंत्री आणि बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचा मुलगा आहे. लालूप्रसाद यादव सध्या तुरूंगामध्ये आहेत. यंदा त्यांच्या उपस्थिती शिवाय पहिल्यांदाच राजेडी अर्थात राष्ट्रीय जनता दल हा पक्ष बिहार विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरला आहे. मात्र तेजस्वीच्या प्रचारसभांना स्थानिकांचा चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणेच इतर राज्यांमध्येही बिगर भाजप सत्तेत येण्याच्या शृंखलेमध्ये आता बिहारचादेखील नंबर लागू लागतो असा सूचक संकेत त्यांनी दिला आजे.

ANI Tweet

संजय राऊत यांनी सध्या मोफत कोरोना लसीच्या भाजपाच्या जाहीरनाम्यामधील घोषणेचादेखील समाचार घेतला. यामध्ये इलेक्शन कमिशनकडून भाजपाला मिळालेली आचारसंहिता मोडली नसल्याची क्लिन चीट वरूनदेखील संजय राऊत यांनी तोड डागली आहे. निवडणूक आयोग म्हणजे आता भाजपाची शाखाच झाला आहे त्यामुळे यापेक्षा वेगळं आम्हांला अपेक्षित देखील नव्हते असे संजय राऊत म्हणाले आहेत.