Bhiwandi Building Collapsed Update: भिवंडी (Bhiwandi) बिल्डिंंग कोसळल्याच्या दुर्घटनेसंदर्भात हाती येणार्या नव्या अपडेट नुसार मृतांंचा (Bhiwandi Building Mishap Death Toll) आकडा हा 20 इतका झाला आहे. याबाबत ठाणे महानगरपालिकेकडुन (Thane Municipal Corporation) माहिती देण्यात आली आहे. काल, 21 सप्टेंबर रोजी पहाटेच्या वेळी पटेल कंंपाऊंंडमधील जिलानी नामक तीन मजल्याची इमारत जमीनदोस्त झाली होती, दुर्घटना घडताच NDRF चे पथक याठिकाणी बचावकार्यासाठी पोहचले होते, सुरुवातीच्या काही वेळात कोसळलेल्या बिल्डिंगच्या ढिगार्याखालुन 10 मृतदेह बाहेर काढन्यात आले होते. इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेतील जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यातही विशेष म्हणजे, भिवंडी परिसरात तुफान पाऊस सुरू असल्याने बचावकार्यात बराच अडथळा आला होता.
प्राप्त माहितीनुसार, जिलानी ही इमारत 43 वर्ष जुनी होती. या तीन मजली इमारतीतील 40 फ्लॅट्समध्ये 100- 120 रहिवाशी राहत होते. सदर इमारत धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये नव्हती, असे भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
ANI ट्विट
Death toll in the Bhiwandi building collapse incident rises to 20: Thane Municipal Corporation #Maharashtra
— ANI (@ANI) September 22, 2020
भिवंंडी इमारत दुर्घटनेनंंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंंद, पंंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंंत्री अमित शाह, यांंसहित अनेक राजकीय नेत्यांंनी सुद्धा ट्विट करुन श्रद्धांजली वाहिली आहे. जखमींंना योग्य ती मदत मिळावी यासाठी महाराष्ट्र मुख्यमंंत्री कार्यालयातुन निर्देश देण्यात आले आहेत. काल ठाणे जिल्हा पालकमंंत्री एकनाथ शिंंदे यांंनी सुद्धा घटनास्थळी जाउन पाहणी केली होती.