महाराष्ट्रातील जालना जिल्हा पोलीस (Jalna Police) आणि नागपूर शहर पोलिसांनी (Nagpur Police 2021) चा 'बेस्ट पोलीस युनिट' (Best Police Unit) पुरस्कार पटकावला आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, समुदाय पोलिसिंग आणि विकासशील प्रशासन अशा विविध श्रेणींमध्ये राज्य पोलिसांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विजेत्यांची नावे 3 जानेवारी रोजी अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) कुलवंत सरंगल यांनी जाहीर केली. जालना पोलिसांना अ वर्ग आणि नागपूर पोलिसांना ब वर्गाच्या आधारावर पुरस्कार मिळाला आहे.
पोलिसांच्या परिपत्रकानुसार, 6,100 पेक्षा कमी भारतीय दंड संहितेच्या केसेस असलेल्या पोलीस युनिट्सना 'कॅटेगरी अ' मध्ये ठेवले आहे, तर 6,100 पेक्षा जास्त आयपीसी केस असलेल्या पोलीस युनिट्सना 'कॅटेगरी बी' मध्ये ठेवण्यात आले आहे. 'क्लास अ' मध्ये रायगड जिल्हा पोलिसांनी सर्वोत्कृष्ट पोलीस तुकडीचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला, तर सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांनी सत्र खटल्यातील दोषींसाठी सर्वोत्कृष्ट तुकडीचा पुरस्कार पटकावला.
पोलिसिंगसाठी तंत्रज्ञानातील सर्वोत्कृष्ट युनिटसाठी बीड जिल्हा पोलीस आणि कम्युनिटी पोलिसिंग उपक्रमातील सर्वोत्तम युनिटसाठी गडचिरोली पोलीस यांना पुरस्कार मिळाला. ब वर्गात पुणे शहर पोलिसांनी द्वितीय क्रमांक पटकावला. मीरा-भाईंदर-वसई विरार पोलिसांनी पोलिसिंगसाठी तंत्रज्ञानातील सर्वोत्कृष्ट युनिटचा पुरस्कार पटकावला. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी दोन पुरस्कार पटकावले आहेत. (हेही वाचा: Mumbai: BMC ने GMLR चौकात जाण्यासाठी भांडुपमधील अनधिकृत बांधकामे हटवली)
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पोलीस युनिट्सचे 45 पूर्व-निवडलेल्या पॅरामीटर्सच्या कामगिरीच्या आधारे मूल्यांकन केले गेले आहे. जालना पोलीस दल औरंगाबाद परिक्षेत्रांतर्गत येते. जालना पोलिस दल औरंगाबाद परिक्षेत्रांतर्गत येते. याच श्रेणीतील औरंगाबाद ग्रामीण पोलिसांना 2020 साठी 'अ' वर्गातील सर्वोत्कृष्ट पोलीस युनिटचा पुरस्कार मिळाला. औरंगाबाद परिक्षेत्राचे प्रभारी विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, पोलीस कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे औरंगाबाद पोलीस परिक्षेत्राला सलग दोन वर्षे हा पुरस्कार मिळाला आहे.