BEST bus (Photo Credits: PTI)

7 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून मुंबईमध्ये बेस्ट कर्मचार्‍यांनी पुकारललेा संप (BEST Strike) अखेर उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court)  मध्यस्थीने नऊ दिवसांनी मागे घेण्यात आला. वेतनवाढीसोबत अनेक प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला होता. दरम्यान उच्च न्यायालयाने संप मागे आदेश देताना बेस्ट कर्मचार्‍यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही असे सांगण्यात आले होते. मात्र बंद दरम्यान झालेला तोटा भरून काढण्यासाठी बेस्ट प्रशासन कर्मचार्‍यांच्या वेतनामध्ये कपात करणार असल्याचं वृत्त न्यूज 18 मराठीने दिले आहे.

बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीच्या नेतृत्वाखाली बेस्टचे 30 हजार कर्मचारी संपावर होते. त्यामुळे नऊ दिवसांमध्ये सुमारे तीन कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले असल्याची माहिती समोर आली आहे. संपामुळे बेस्टला सुमारे 25 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. बेस्ट प्रशासन संप काळात गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावर गदा आणण्याचा विचार करत आहेत. कर्मचाऱ्यांचे वेतन कापले जाणार नाही, मात्र नऊ दिवस कामावर गैरहजर राहिल्याने त्या दिवसांचे वेतन दिले जाणार नाही, असे बेस्टमधील वरिष्ठ सूत्रांनी सांगितलं आहे. BEST Strike: एक तासाच्या आत संप मागे घ्या,बेस्ट कर्मचाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश; कामगारांना 10 टप्प्यातील वेतनवाढ लागू करण्याचे प्रशासनाला निर्देश

बेस्ट कर्मचार्‍यांच्या वेतनवाढीवर अनिल परब यांची प्रतिक्रिया

अनिल परब यांनी काल प्रतिक्रिया देताना, बेस्ट कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये 7,000 नव्हे तर अवघ्या 3428 रूपयांची वाढ होणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे जर पुढील महिन्यात सात हजारांची पगारवाढ झाल्यास आम्हांला येऊन दाखवा अशी प्रतिक्रिया देताना अनिल परब यांनी शशांक राव हे केवळ निमित्त असून शिवसेना बदनाम करण्यामागे काही हात असल्याचा आरोपदेखील अनिल परब यांनी केला आहे.