BEST Employees Hunger Strike Day 3: बेस्ट कामगार नेते शशांक राव यांची प्रकृती बिघडली; KEM रूग्णालयात दाखल
Shashank Rao | (File Photo)

BEST Employees Indefinite Hunger Strike Day 3:  मुंबईमध्ये बेस्ट कर्मचार्‍यांचे वेतनवाढीसाठी बेमुदत उपोषण सुरू आहे. या उपोषणादरम्यान बेस्ट कामगार नेते शशांक राव (Shashank Rao) यांची प्रकृती बिघडली आहे. प्रकृती खालावत असल्याने शशांक राव यांना परेल येथील केईएम रूग्णालयात (KEM Hospital) दाखल करण्यात आलं आहे. मागील दोन दिवसांपासून बेस्ट कर्मचार्‍यांचे मुंबईमधील वडाळा (Wadala) आगारामध्ये बेमुदत उपोषण सुरू आहे. मुंबई: प्रलंबित मागण्यांसाठी वडाळा डेपो बाहेर बेस्ट कर्मचा-यांचे उपोषण सुरुच

बेस्ट कर्मचारी सध्या त्यांना सातवे वेतन आयोग लागू करावे या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. कर्मचार्‍यांसोबतच कामगार नेते शशांक राव देखील उपोषणाला बसले आहेत. बेस्ट कर्मचार्‍यांच्यासोबत मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बीएमसी आयुक्त प्रविण परदेशी, बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांचा समावेश आहे. मागील दोन दिवसांपासून सकारात्मक बोलणी न झाल्याने आजही तिसर्‍या दिवशी बेस्ट कर्मचारी उपोषणावर ठाम आहेत.

2 सप्टेंबर पासून महाराष्ट्रात गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर आता बेस्ट कर्मचार्‍यांचे उपोषण सुरू राहिल्यास ते चिघळण्याची दाट शक्यता आहे.