Civil hospital in nashik (Photo Credits: ANI)

नवजात बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष लक्ष देत नाशिक (Nashik) येथील सिव्हिल हॉस्पीटलमध्ये (Civil Hospital) एक नवीन स्तुत्यप्रिय असा उपक्रम राबविण्यात आला आहे. स्वच्छता, सुरक्षा आणि नवजात बालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देत सिव्हिल रुग्णालयात नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात आता आठवड्याचे 7 दिवस 7 भिन्न रंगाच्या बेडशीट्स पाहायला मिळणार आहेत. यात प्रत्येक दिवसासाठी एक विशेष रंग निवडण्यात आला आहे.

नवजात बालकाच्या अतिदक्षता विभागाचे प्रमुख पंकज गजरे याविषयी सविस्तर माहिती देताना म्हणाले की, आम्ही दिवसाप्रमाणे सोमवारी हिरवा रंग, मंगळवारी गडद निळा, बुधवारी गुलाबी, गुरुवारी मरून, शुक्रवारी केसरी, शनिवारी पोपटी आणि रविवारी आकाशी रंगाच्या बेडशीट्स बदलणार आहोत. मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा खूप महत्वपुर्ण असा बदल असल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा- World Breastfeeding Week: स्तनपान करताना काय काळजी घ्यावी, जाणून घ्या सविस्तर

यामुळे त्या बेडशीट्स नित्य नियमाने धुतल्या जात आहेत की नाही ते कळेल. तसेच प्रत्येक क्युबिकलसाठी वेगवेगळे मॉप्स आणि बादल्या वापरल्या जातील असेही त्यांनी सांगितले.