खातेदारांची रक्कम, ठेवी सुरक्षित ठेवणा-या बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) च्या मिरज (Miraj) शाखेला 17 कोटींचा गंडा घातल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. या प्रकरणी मुंबईतील कंपनीच्या संचालकासह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरजेतील बँक ऑफ बडोदा मध्ये कर्जासाठी तारण म्हणून ठेवण्यात आलेल्या 16 कोटी 97 लाख रुपयांची अफरातफर करण्यात आली आहे. या प्रकरणी बँकेचे मॅनेजर जगदीश पाटील यांनी मिरज शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मटाने दिलेल्या माहितीनुसार, मिरज शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील सी. एन. एक्स. कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीने बँक ऑफ बडोदाच्या मिरज शाखेकडून व्यवसायासाठी कर्ज घेतले होते. कर्जासाठी त्यांनी कंपनीच्या कोल्ड स्टोरेजमधील माल तारण ठेवला होता. बँकेला पूर्वकल्पना दिल्याशिवाय तारण मालाची विक्री किंवा विल्हेवाट लावू नये, असा करार बँक आणि कर्जदारांमध्ये झाला होता. मात्र, मार्च 2017 पासून कर्जदारांनी कराराचे उल्लंघन करून तारण ठेवलेल्या मालाची परस्पर विल्हेवाट लावली. याची माहिती बँकेला मिळताच बँकेने तात्काळ मिरज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. हेदेखील वाचा- Banking Service: बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी; आता 1 नोव्हेंबर 2020 पासून पैसे जमा करणे व काढण्यासाठी भरावे लागेल शुल्क- Reports
यानुसार पोलिसांनी सी. एन. एक्स. कार्पोरेश लिमिटेड कंपनीचे संचालक निरुपमा पेडुरकर, अजित नारायण जाधव, प्रद्युम्न बाळगोंडा पाटील, राहुल दिनेश मित्तल, मीरा दिनेश मित्तल, दीपक मधुकर गुरव, गणेश सोपान पवार आणि प्रशांत प्रकाश निकम यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.