Representational Image (Photo Credits: File Image)

महाराष्ट्रात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) अंतर्गत अपात्र लाभार्थी महिला सध्या सरकारच्या रडारवर असताना आता मुंबई मध्ये बेकायदेशीरपणे राहणार्‍या बांग्लादेशी महिला देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलं आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या धडक मोहिमेमध्ये कामाठीपुरा भागात 5 बांग्लादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एक महिला लाडक्या बहीण योजनेची लाभार्थी आहे.

गुन्हे शाखेने एका एजंटसह चार महिलांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणार्‍या महिलेने कागदपत्रांची जुळवाजुळव कशी केली? याचा तपास सुरू आहे. सैफ अली खान वर झालेल्या हल्ला प्रकरणानंतर मुंबईत बेकायदेशीरपणे राहत असलेल्या, काम करत असलेल्या बांग्लादेशींचा मुद्दा चर्चेत आला आहे. सध्या अनेक ठिकाणी पोलिसं धाडसत्र घालून या घुसखोर बांग्लादेशींना ताब्यात घेत आहेत. Illegal Bangladeshi Immigrants: बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांवर कारवाई करण्याचे केंद्राचे महाराष्ट्राला निर्देश; Saif Ali Khan वरील हल्ल्यानंतर वाढला राजकीय व सामाजिक दबाव .

मुंबईत गुन्हे शाखेची कारवाई

मुंबईत गुन्हे शाखेने महादेव यादव या 34 वर्षाच्या एजंटला बांगलादेशी व्यक्तींना आश्रय देणे आणि रसद पुरवण्याचा ठपका ठेवत अटक केली आहे. पकडलेल्या बांगलादेशी महिलांपैकी एका महिलेचे नाव उर्मिला खातुन असे असून ती 23 वर्षांची आहे.

लाडकी बहीण योजना मध्ये पैसे परत घेणार?

विधानसभा निवडणूकीत महायुतीच्या यशामध्ये 'लाडकी बहीण योजना' गेमचेंजर ठरल्याची चर्चा होती. मात्र आता निकषांबाहेर ज्या महिला या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांच्यावर कारवाई होऊ शकते असे समोर आले आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री यांनी अपात्र लाभार्थी महिलांकडून पैसे परत घेतले जाणार नाही असं म्हटलं आहे. तर