Chhagan Bhujbal (Photo Credits-ANI)

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज 7 वी पुण्यतिथी साजरी केली जात आहे. त्यासाठी दादर मधील शिवाजी पार्कात उभारण्यात आलेल्या त्यांच्या स्मारकाला श्रद्धांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहेच. याच दरम्यान राष्ट्रवादी पक्षाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि जयंत पाटील (Jayant Patil ) यांनी सुद्धा उपस्थिती लावत बाळासाहेबांना श्रद्धांजली दिली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्रातील राजकरणाची समीकरणे बदलेली दिसून येणार आहेत. पुण्यतिथी निमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या परिवारासह शिवाजी पार्क मध्ये उभारण्यात आलेल्या बाळासाहेबांच्या स्मारकाला श्रद्धांजली देण्यासाठी पोहचणार आहेत. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे काही नेते मंडळी सुद्धा श्रद्धांजली देण्यासाठी येऊ शकतात. तर छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांनी सुद्धा उपस्थिती लावत श्रद्धांजली वाहिली आहे. छगन भुजबळ आणि बाळासाहेब यांच्यामध्ये काही वाद होता.  शिवसेनेकडून आजच्या दिवशी काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत नवे सरकार स्थापन करण्याची घोषणा केली जाईल अशी शक्यता होती. परंतु राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सत्ता स्थापनेला अजून वेळ लागणार असल्याचे विधान केल्यानंतर शिवसेनेत नाराजी दिसून आली.(शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली देण्यासाठी काँग्रेस नेते उपस्थितीत राहण्याची शक्यता)

ANI Tweet:

तर मुंबईत 1992-93 साली झालेल्या जातीय दंगल प्रकरणाच्या चौकशीसाठी श्रीकृष्ण आयोग नेमण्यात आला होता. या श्रीकृष्ण आयोगाने बाळासाहेब ठाकरेंवर ठपका ठेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यास सांगितले होते. त्यानुसार 2000 साली राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने छगन भुजबळ यांनी बाळासाहेबांच्या अटकेच्या आदेशावर स्वाक्षरी केली होती. 24 जुलै 2000 साली बाळासाहेबांना अटक झाल्यानंतर त्याच दिवशी त्यांची सुटका झाली होती.